जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार 14 एप्रिल 2023 आज रोजी जामखेड शहरातील ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी आली. यावर्षी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. नंतर मुलांमध्ये चिं.कार्णिक जगताप,कुमारी वैष्णवी शिंदे कुमारी ऋतुजा पोटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर शिक्षकांमधून श्रीमती प्रा.पोकळे मॅडम,श्री प्रवीण गायकवाड सर व उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसूळ सर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग, सत्याग्रह,संघर्ष,शिक्षण यावर आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतिशय संघर्षमय अशा जीवनामध्ये…
Author: mahalokwani
नगर – तुम्ही, जर शिकले तरच ताठ मानाने जगताल, तुम्ही, जर संघटीत होऊन आपल्यावरील अन्यायाला विरोध केला तर न्याय मिळेल, पण संघर्ष करतांना मात्र माणसाला माणुसकी मिळवून देण्यासाठी संघर्ष करा, असा संदेश भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. तो कृतीतून साकारण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन व्याख्याते अशोक औटी यांनी केले. सावेडी उपनगरात गुलमोहोर रोडवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वंचित बहुजन आघाडी व गुलमोहोर नागरी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा महासचिव योगेश साठे, अॅ्ड. लक्ष्मीकांत पठारे, अशोक औटी, शिरीष जानवे, कारभारी कराळे, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब सोनवणे, माजी कृषी अधिकारी शिरिष जाधव, अभिजीत मेढे,…
वार्ड क्र . २ चे नगरसेवक सुनील त्र्यबंके यांना बुधवार दिनांक १२/०४/२०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिर, गीते वस्ती या भागातून नगरिकांचा कॉल आला कि आम्हाला माघील ३ दिवसापासून पाणी येत नाही, यावेळी त्यांनी कोणत्याही क्षणाची वाट न पाहता त्या भागात गेले आणि तिथे जाऊन त्या लोकवस्ती मधील नागरिकांशी चर्चा केली , आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन, प्रत्यक्ष पाहणी केली , त्यावेळी तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केली की, असा नगरसेवक लाभणे हे आमचे भाग्य आहे , फोन करता क्षणी ते आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमच्या दारात हजर झाले , नाही तर काही ठिकाणचे नगरसेवक यांच्या भेटी या फक्त…
गेल्या 2 दिवसांपासून राजकीय वर्तुळातली चर्चा अजित पवारांच्या (Ajit pawar) अवतीभवती फिरतेय. सत्तासंघर्षाचा निकाल जवळ आलाय आणि त्याचपार्श्वभूमीवर अजित पवार भाजपसोबत जाणार का? अशा चर्चा आणि दावे सुरु झाले. पण खरंच असं काही होण्याची शक्यता आहे का? याबाबत विचार करणं महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आमदार अपात्र होणार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार, असा दावा केला. त्यानंतर पुन्हा केंद्रस्थानी अजित पवार आले आहेत. हाच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही पत्रकारांनी विचारला, पण पवारांनी न बोलणंच पसंत केलं. सत्तासंघर्षाच्या निकाल कधीही येऊ शकतो. ती तारीखही जवळ येतेय आणि त्यामुळं शक्यता…
जामखेड : अनेक चहांना टक्कर देऊन सर्वांना वेड लावणारा तसेच अल्पावधीतच महाराष्ट्रासह इतर राज्यातही ग्राहकांच्या ओठांवर, ओठांतून पोटात व तेथून मनामनात पोहोचलेल्या उपसरपंच चहाचे नवीन दालन आता जामखेड करमाळा रोड, पाडळी फाटा येथे सुरू झाले आहे. ‘उपसरपंच चहा’ या हॉटेलचे उद्घाटन शाखेचे संस्थापक सचिन वाघमारे यांच्या आईवडिलांच्या हस्ते संपन्न झाले आहे. दरम्यान आता ग्राहकांना गुळाच्या चहाबरोबरच ब्लॅक, लेमन, या चहांची सुद्धा चव घ्यायला मिळणार आहे. पाडळी फाटा या परिसरात हे दर्जेदार व नामचीन हॉटेल सुरू झाल्याने ग्राहकांना उपसरपंच चहाचा स्वाद मिळणार आहे. त्याप्रमाणेच हे हॉटेल सुरू झाल्याने पाडळी येथील कॉलेज विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील व्यापारी व इतर खवय्यांनाही विविध पदार्थांचा नम्रपणे आस्वाद…
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार जामखेड शहरातील जि.प.प्रा.शाळा तपनेश्वर , जामखेड येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पंचायत समिती चे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले.शाळेतील लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ श्री गणेश या गाण्याने केली. यामध्ये लोकगीत,देशभक्ती पर गीत,हिंदी गीत,या गाण्यावर नृत्ये सादर करुन उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती चे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,विस्तार अधिकारी सिद्धनाथ भजनावळे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,नगरसेवक दिगांबर चव्हाण, मोहन वस्ताद पवार,जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, विश्वस्त मुकूंदराज सातपुते,शिक्षक नेते राम निकम,जामखेड तालुका कर्मचारी कृती…
महालोकवाणी न्यूज:- अहमदनगर – जामखेड (Jamkhed) तालूक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षण संस्थेचा कारभार गेली विस वर्ष बोगस संचालक मंडळ करत असून . 2001 नंतर एक ही बदल अर्ज मंजूर नसताना हे संचालक मंडळ कार्यरत आहे . 2001 नंतर एकदाही धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेतली नाही व अनेकदा नोटीस काढून ही सध्याचे कारभारी एकही कागद पत्री पुरावा सादर शकले नाही . धक्कादायक म्हणजे संस्था कार्यालयात कोणते ही अधिकृत दप्तर नाही . कोणताही वार्षिक ताळेबंद संस्थेने आज पर्यंत सादर केले नाहीत त्यामुळे विस वर्ष हे संचालक मंडळ कोणत्या अधिकाराने काम करत होते व त्यांनी किती आर्थिक गैरव्यवहार केला याचा तपास आर्थिक गुन्हे शाखे…
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: – अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी ता.पाथर्डी येथे गुरुवर्य संत भगवानबाबा यांनी सुरु केलेला नारळी सप्ताह निमित्ताने दि.०४ एप्रिल ते दि.११ एप्रिल या कालावधीत आयोजित ८९ वा.नारळी अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता. दररोज सकाळी काकडा,भजन,गाथा भजन, रामकथा, दररोज रात्री कीर्तन,जागर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज (ता.११)रोजी भगवान गडाचे महंत हभप.नामदेव शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी १ वाजता संत भगवानबाबा यांच्या चरण पादुकावर पुस्पवृष्टी करत सप्तहाची सांगता करण्यात आली. सप्ताहाच्या कार्यक्रमात अनेक साधू संत,राजकीय नेते यांनी भेट दिली. सांगता प्रसंगी माजी मंत्री पंकजा मुंडे,माजी मंत्री धनंजय मुंडे,शेवंगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे,राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे,यांच्यासह अनेक मान्यवर…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचालित, सहायक आयुक्त कार्यालय, अहमदनगर अंतर्गत, अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा आरोळेनगर, जामखेड येथे मंगळवार दि. ११ एप्रिल २०२३ रोजी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत १ एप्रिल २०२३ ते १ मे २०२३ हा कालावधी सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आज क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कांबळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड शहरात महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त समाजमंदिर बाजारतळ येथे सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समिती व समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक मिलिंदजी शिंदे यांचा भिमगितांचा क्रांतीकारी जलसा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी केले होते. सायंकाळी ७.०० वाजता सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक मिलिंदजी शिंदे यांचे आगमन झाले. याप्रसंगी भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानसभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात व भाजपाचे नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले…तसेच मिलिंद शिंदे यांचा सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष राजन समिंदर सर,…