Author: mahalokwani

जामखेड प्रतिनिधी:धनराज पवारदि.०३/०४/२०२३ आज रोजी कृषि उत्पन्न बाजार समिति जामखेड पंचवार्षिक निवडणूकीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली जामखेड नगर परिषद चे नगरसेवक दिगंबर चव्हाण व अहमदनगर जिल्हा मजूर फेडरेशन चे संचालक चंद्रकांत राळेभात यांनी उमेद्वारी अर्ज सहायक निवडणूक अधिकारी एन.बी.मुंढे यांच्याकडे दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते प्रा.मधुकर राळेभात जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे,प्रा.संजय वराट,युवक काँग्रेसचे नेते राहुल उगले,चेअरमन किसनराव ढवळे, मा. उपसभापती दिपक पाटील ,नगरसेवक पवनराजे राळेभात, प्रदीप भोसले अमित जाधव,संतोष निगुडे, श्रीकांत लोखंडे, प्रल्हाद डिसले, शरद शिंदे, सरपंच प्रशांत शिंदे, कुंडल राळेभात, अनिरुद्ध रसाळ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत माहिती…

Read More

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार दि.०३/०४/२०२३ रोजी कृषि उत्पन्न बाजार समिति निवडणूक २०२३ साठी शेतकरी मतदार संघ ग्रामपंचायत मधून कृषि उत्पन्न बाजार समिति चे माजी संचालक सागर सदाफुले यांनी उमेद्वारी अर्ज सहायक निवडणूक अधिकारी एन.बी.मुंढे यांच्याकडे दाखल केला. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समिति चे माजी सभापती गौतम उतेकर,मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे,शिवसेना तालुका प्रमुख (उध्दव ठाकरे) संजय काशिद,भिमटोला ग्रुप चे बापूसाहेब गायकवाड,समता ग्रुप चे अध्यक्ष संतोष गव्हाळे, मा. सरपंच शिवाजी ससाणे, उपसरपंच अविनाश गायकवाड, ग्रा.पं.सदस्य विजय देडे, उपसरपंच पै. दत्ता शिंदे आदी उपस्थित होते याबाबत माहिती अशी की,कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून 11 सदस्य निवडले जाणार आहेत. या…

Read More

नगर – वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी मधील अंतिम वर्षातील साहिल नेटके व वरुण पाटणी या दोन विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी स्नातक अभिक्षमता परिक्षा (गेट) प्रवेश फेरीसाठी पात्र ठरले आहेत. सदर पात्रतेमुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अनेक प्रकारच्या संधी त्यांना उपलब्ध होणार आहेत. साहिल व वरुण हे एम.टेक. प्रवेशासाठी पात्र झाल्यामुळे त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष विनय नाथ पाउलबुधे, सदस्य साई पाउलबुधे, बी.एड्.च्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, डी. फार्मसीच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण, पदाधिकारी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी या दोघांचे कौतुक केले आहे.

Read More

विविध मागण्यांसाठी राज्यातील नायब तहसीलदार आजपासून (ता. ३) संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील ३५८ तालुक्यांमधील तहसील कार्यालयात आज शुकशुकाट असण्याची शक्यता आहे नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते, हा ग्रेड पे मुद्दा घेऊन नायब तहसीलदारांनी आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने १३ ऑक्टोबर १९९८ रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरून वाढवून वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती. त्यामुळे गेली २५ वर्षे राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात, मात्र वर्ग तीनचे वेतन घेत आहेत. वाढीव ग्रेड पे मागणी मान्य झाल्यास, राज्यातील २२०० पेक्षा…

Read More

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी ता.पाथर्डी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता. दररोज सकाळी काकडा,भजन,गाथा-भजन,रामकथा,दररोज रात्री कीर्तन ,जागर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.उद्या (ता.३)रोजी गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.त्यानंतर दुपारी १२वाजता संत वामनभाऊ यांच्या चरण पादुकावर पुस्पवृष्टी करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार असल्याचे महंत विठ्ठल महाराज यांनी सांगितले आहे दरम्यान आज गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. शेकडो महिला डोक्यावर कलश घेऊन ,तसेच भगव्या पताका घेऊन पुरुष लहान मुले सहभागी झाले होते.…

Read More

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार कर्जत-जामखेड : पायाला मार लागून अपघातात गंभीर झालेल्या कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील चैतन्य बाबासाहेब बिटके या रूग्णास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. या रुग्णाला आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात आला होता. कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील चैतन्य बाबासाहेब बिटके या 15 वर्षीय मुलाचा पाडव्याच्या आदल्या दिवशी मोटारसायकल अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. सदर रूग्णावर पुण्यातील संचेती हाॅस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. पायावरील शस्त्रक्रियेसाठी लाखो रूपयांचा खर्च येणार होता.बिटके यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हा खर्च भागवायचा कसा असा…

Read More

साई बाबांचं प्रति शिर्डी अर्थात मावळातील प्रति शिर्डी शिरगावच्या सरपंचांवर धारदार शस्त्रांनी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सरपंचांचा मृत्यू झालाय. या घटनेनं मावळ तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रवीण गोपाळे असं मयत सरपंचांचे नाव आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केलेत या हल्ल्यानंतर गोपाळे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर तातडीनं त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला नेमका का करण्यात आला? हे हल्लेखोरांच्या अटकेनंतर स्पष्ट होणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जमिनीच्या प्लॉटिंगमधून ही हत्या झाल्याचा पोलीसांना संशय आहे. प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. साधारण 9…

Read More

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार जामखेड – श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने जामखेड शहरात विविध मर्दानी खेळ बरोबरच अयोध्या येथील नियोजित श्रीराम मंदिरात पुजलेल्या राम सिता व हनुमानच्या मुर्ती तसेच श्रीरामाचा भव्य पुतळा पालखीत घालून मिरवणूक काढण्यात आली. पाच तास चाललेली मिरवणूक शांततेत पार पडली. सकल हिंदू समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम जयंती निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिध्दीविनायक मंदीरापासुन मिरवणूकीची सुरवात हनुमान चालीसाचे सार्वजनिक पठण करून सुरवात झाली. मिरवणूकीत मध्यप्रदेश मधून आलेली पथके सहभागी झाले होते. मुली व महिलांनी दांडपट्टा प्रात्यक्षिक करून प्रेक्षकांचे मने जिंकली. लाकडी खांब व दोरीवरचे मल्लखांब…

Read More

युती सरकारला आसमान दाखवण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. कोणत्याही कारणाने ही मूठ सैल पडू द्यायची नाही, असा चंग शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बांधलाय. सत्ताधाऱ्यांविरोधातील रणशिंग फुंकण्यासाठी महाविकास आघाडीने संयुक्त संभांची घोषणा केली. मराठवाड्याचं प्रवेशद्वार संभाजीनगरातून पहिल्या सभेची घोषणा केली. २ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या सभेसाठी युद्धपातळीवर तयारी केली जातेय. मात्र त्याच दिवसापासून भाजपच्या गौरवयात्रेचंही आयोजन करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्राला उजाळा देण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक मतदारसंघात ही यात्रा आयोजित करण्याची घोषणा शिंदे फडणवीस यांनी केला. संभाजीनगरात ही गौरव यात्रा २ ते ५ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या २ एप्रिल रोजी संभाजीनगरात शिंदे-भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचं मोठं शक्तिप्रदर्शन होण्याची…

Read More

अहमदनगर शहर प्रतिनिधी:- विजय मते नगर – वर्षातील 365 दिवस माझ्या भगिनी, महिला कुटूंबातील जबाबदारी पार पाडून, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करुन वेळप्रसंगी अन्यायाला, अपमानाला सामोरे जाते. महिलांमध्ये सहनशक्ती असल्याने त्या निमुटपणे सारेकाही सहन करतात ते केवळ कुटूंबाच्या भल्यासाठी. परंतु महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अन्याय सहन न करता दाद मागितली पाहिजे. महिलांच्या सुरक्षितेसाठी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली असून, महिलांना 100 टक्के न्याय देण्याची आयोगाची भुमिका राहिली आहे. समाजानेही महिला दिनीच महिलांचे गुणगान न करता महिलांचा दररोज आदर, सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी केले. सावेडी उपनगरात संदेशनगर येथील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनिल…

Read More