महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी या निवडीबद्दल रामदास पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले
संपादक :- सचिन कांबळे
जामखेड, दि. २४ ऑक्टोबर २०२५ भारतीय जनता पार्टी jamkhed जामखेड शहर मंडळ कार्यकारिणीमध्ये मा. रामदास कंठीलाल पवार यांची “भटक्या मुक्त आघाडी प्रमुख” या महत्त्वपूर्ण पदावर निवड झाली आहे. महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी या निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा पत्र दिले आहे.
Jamkhed| जामखेड भटक्या मुक्त आघाडी प्रमुखपदी रामदास पवार – नगरपरिषद निवडणुकीला नवी दिशा!
प्रा. राम शिंदे यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की,
“आपले नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि समाजातील योगदान ही पक्षासाठी अभिमानाची बाब आहे. पक्षनिष्ठा आणि जनहितासाठी आपण केलेले कार्य निश्चितच फळाला येईल.”

Table of Contents
Jamkhed जामखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये या निवडीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी जामखेड नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते आहे.

रामदास पवार यांनी शहर व तालुका पातळीवर पक्षसंघटन मजबूत ठेवण्यासाठी, तसेच सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभागासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या निवडीमुळे स्थानिक भाजपला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षाच्या वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

