Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » jamkhed जामखेड महाविद्यालया च्या वतीने प्रसिद्ध निवेदक श्री आनंदराव देशमुख यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराबद्दल सत्कार
ब्रेकींग न्यूज

jamkhed जामखेड महाविद्यालया च्या वतीने प्रसिद्ध निवेदक श्री आनंदराव देशमुख यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराबद्दल सत्कार

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 17, 2026Updated:February 17, 2026No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


आज दिनांक १७/०२/ २०२६ रोजी जामखेड jamkhed महाविद्यालय, जामखेड येथे प्रसिद्ध आकाशवाणी निवेदक मा .श्री आनंद देशमुख सौ. कुंदाताई देशमुख यांचा महाविद्यालयाचे वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. सुनील पुराणे यांनी केले. जामखेड सारख्या दुष्काळी दुर्गम भागात जन्मलेले आनंद देशमुख यांना ब्रिटिश पार्लमेंटचा “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस”लंडन हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारांने जामखेडकरांच्या ‘शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवण्याचे काम केले आहे.

त्यांना भारतातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील सलग 33 वर्ष निवेदनाबाबत ब्रिटिश पार्लमेंटने पुरस्कृत केलेला पहिला पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने देखील त्यांना “जिंदादिल “पुरस्कार प्रदान केला आहे.त्याचबरोबर अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. 33 वर्ष सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात निवेदक व पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरचा 33 वा सत्कार त्यांचा ते ज्या संस्थेत शिकले त्या संस्थेच्या महाविद्यालयात होणे हा योगायोग आज जुळून आला. महाविद्यालयासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण असून एवढ्या मोठ्या कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान करण्याची संधी माजी सचिव श्री शशिकांत देशमुख यांच्या माध्यमातून महाविद्यालयाला प्राप्त झाली याचा खूप आनंद वाटत असल्याचे प्राचार्य डॉ. पुराणे यांनी म्हटले.

संस्थेचे विद्यार्थी असलेले श्री. आनंद देशमुख यांचे नाव संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये वर्ल्ड बुक रेकार्ड, लंडन मध्ये नोंदविले गेले ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. अशा प्रकारचे जागतिक रेकार्ड प्रस्थापित करणारे ते जामखेड तालुक्यातील पहिले व्यक्ती असल्याचे सांगून संस्थेचे माजी सेक्रेटरी शशिकांत देशमुख यांनी हा त्यांच्या बरोबरच संस्थेच्या दृष्टीनेही अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. ते आकाशवाणी मध्ये २४ वर्ष निवेदक तथा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत होते. गेली ५७ वर्षे ते निवेदक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ. कुंदाताई यांनी प्रत्येक कार्यक्रमाच्या बारीक-सारीक नोंदी ठेवल्या आहेत आणि सध्या त्या त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजनाची धुरा सांभाळतात.

याप्रसंगी कुंदाताई यांनी श्री. आनंदजी यांचा जीवनपट उलघडणारे आत्मचरित्र लिहिण्याचा संकल्प केला. श्री. आनंदजी यांना ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यीच्या शैक्षणिक, सामाजिक परिस्थितीचे जाण असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आज ही त्याची ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे. त्यांनी आज कला साहित्य व संगीत क्षेत्राबद्दल अगदी मनमोकळ्या व ओघवत्या शैलीत संवाद साधला. संस्थेने कार्यक्रम घेतल्यास त्या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहू अशी ग्वाही दिली.


यावेळी त्यांच्या सौभाग्यवती कुंदाताई देशमुख, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री दिलीपशेठ गुगळे,माजी सचिव मा. श्री शशिकांत देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुराणे एस. जी, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. गाडेकर एस.एन, कला शाखाप्रमुख फलके ए.बी तसेचसर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. व आभार कला शाखाप्रमुख प्रा. फलके ए. बी यांनी ओघवत्या शैलीत मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRTE Admission 2026: महाराष्ट्रात RTE प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करावा? नियम, तारीख, पात्रता
Next Article Ajit Pawar plane accident विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा, फ्लाइट डेटा रेकॉर्डर डेटा मिळाला
mahalokwani
  • Website

Related Posts

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

March 30, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.