जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता इंधन आणि गॅस Gas बाजारावरही दिसू लागला आहे. संभाव्य तुटवड्याच्या भीतीमुळे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची मागणी अचानक वाढल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

अनेक शहरांमध्ये नागरिकांनी गॅस Gas एजन्सीसमोर गर्दी केल्याचे दिसून आले. काही लोकांनी भविष्यात गॅसची कमतरता निर्माण होऊ शकते या भीतीने अतिरिक्त सिलेंडर बुक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गॅस वितरणावरही ताण येत असल्याचे एजन्सी चालकांनी सांगितले.
तज्ञांच्या मते, युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत असतो. त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेलसह एलपीजीच्या किंमती आणि उपलब्धतेवर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना घाबरून जाऊन अनावश्यक साठा करू नये असे आवाहन केले आहे. सध्या गॅसचा Gas पुरवठा सुरळीत सुरू असून कोणतीही टंचाई निर्माण झालेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
