महालोकवाणी न्यूज:-
नगर – सावेडी उपनगरातील शिलाविहार येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात जयंती उत्सवानिमित्त दि.26 जानेवारी ते गुरुवार दि.2 फेब्रुवारी 2023 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन श्री ब्रह्मचैतन्य सेवाभावी मंडळाने केले आहे.
२१ वर्षे जॉब केल्यानंतर नोकरीवरून Admin,भारतीय व्यक्तीचे कंपनीला भावनिक पत्र
या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमात रोज पहाटे 5 ते 7 रुद्राभिषेक, 9 ते 11 श्रीं चे ग्रंथ वाचन, 11 ते 12 भजन, 12 ते 12.30 आरती, 12.30 ते 2 महाप्रसाद होऊन दुपारी 3 ते 6 भागवत कथा, 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 10 पंचपदी भजन होणार आहे
भागवत कथा हभप समर्थ कृपांकित मंदार महाराज रामदासी हे आपल्या सुमधूर वाणीतून सांगणार आहे. तर ग्रंथवाचनसाठी सौ.मनिषाताई भोंग व्यासपीठ चालक असणार आहे. या सप्ताहात अखंड नामजपासाठी भाविक एक-एक तास बसणार आहेत.
ज्या भाविकांना पारायण करिता बसायचे आहे. त्यांनी ग्रंथ उपलब्ध होण्यासाठी विजय मते (मो.9225322389) यांच्याशी संपर्क साधावा, म्हणजे गैरसोय होणार नाही.
सप्ताहाची सांगता गुरुवार 2 फेब्रुवारी 2023 रोजी श्रीं ची पालखी मिरवणूक 9 ते 11 हभप मनोहर महाराज सिनारे यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने होईल.
तरी भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुंदरदास रिंगणे, रेखाताई रिंगणे, प्रसाद देवा, अशोक मुळे आदिंनी केले आहे.
