Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मी जॅकलिनला सोडावं अशी नोराची इच्छा होती, पण…; सुकेश चंद्रशेखरचा नवा ‘लेटर’ बॉम्ब

मी जॅकलिनला सोडावं अशी नोराची इच्छा होती, पण…; सुकेश चंद्रशेखरचा नवा ‘लेटर’ बॉम्ब

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 21, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नवी दिल्ली : २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आणखी एक खळबळजनक दावा करणारं पत्र लिहिलं आहे. सुकेशने हे पत्र नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील वादावर लिहिलं आहे. नोरा फतेहीनं तिचा जबाब आर्थिक गुन्हे ब्युरो (EOW)समोर बदलला होता. नोराला मी जॅकलीनला सोडावे असं वाटत होतं. माझ्या नकारानंतरही नोरा मला त्रास देत आहे असा दावा सुकेशने केला आहे.

ऐकावं ते नवलंच; चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा..

सुकेशने पत्रात पुढे लिहिलंय की जॅकलिन आणि मी गंभीर नात्यात होतो. यामुळेच नोराला जॅकलिनचा हेवा वाटू लागला होता. जॅकलीनबाबत मला भडकवायची आणि माझं ब्रेनवॉश करत होती. नोराची इच्छा होती की मी जॅकलीनला सोडावं. निक्की तांबोळी आणि चाहत खन्ना हे फक्त व्यावसायिक सहकारी होते आणि ते माझ्या प्रॉडक्शनमध्ये काम करणार होते. मी जॅकलीनला सोडून तिला डेट करायला लागावे असी नोराची इच्छा होती. नोराने मला दिवसातून किमान १० वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला आणि जर मी तिच्या कॉलला उत्तर दिले नाही तर ती कॉल करत राहण्यासाठी माझ्यावर दबाव आणत असे असं त्याने सांगितले.

सुकेश चंदशेखर याने अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलिनवर लावलेले आरोप बनावट असल्याचं म्हटलं आहे. नोरावर आरोप करताना सुकेश म्हणाला की, नोराने ईडीसमोर आणि EWO समोर वेगवेगळी विधाने केली, यावरून ती तिच्या मनातून एक कथा रचत असल्याचं सिद्ध होतं. तिला माझ्याकडून कार घ्यायची नाही असं तिने सांगितले ते सर्वात मोठे खोटे आहे. नोरा मला भेटली तेव्हा तिच्याकडे महागडी कार नव्हती. पण तिने आणि मी मिळून एक आलिशान कार निवडली ज्याचे स्क्रीन शॉट्स ED कडे आहेत. त्यामुळे नोराने खोटे बोलू नये असं सुकेशनं बजावलं.  

शुभमन गिल को मिला बहुत ‘सारा’ प्यार; शुभमनची गर्लफ्रेंड कोण ?, सारा खान की सारा तेंडुलकर..

खरं म्हणजे मला तिला रेंज रोव्हर द्यायची होती. पण ती स्टॉकमध्ये नव्हती. म्हणून मी त्याला एक एस सीरीज BMW कार भेट दिली जी तिने बराच काळ स्वत:कडे ठेवली होती. नोरा मला महागड्या बॅग आणि दागिन्यांचे फोटो पाठवत असे. ज्या मी तिला भेटवस्तू दिल्या आहेत. ती अजूनही त्यांचा वापर करत आहे. मी नोराला सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या, त्यामुळे ती ते खरेदी केल्याचे बिल कधीही दाखवू शकत नाही. निक्की तांबोळी आणि चाहता खन्ना यांच्याशी माझे फक्त व्यावसायिक संबंध होते आणि दोघेही माझ्या निर्मितीमध्ये काम करणार होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleLIC Recruitment 2023: नोकऱ्यांचे वर्ष! एलआयसीमध्ये 9394 पदांवर भरती; अर्ज कसा कराल…
Next Article अति विषारी साप पकडणारी महिला आहे तरी कोण.! आत्तापर्यंत सातशेहून अधिक साप पकडले..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.