Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » लिंगायत समाजाचा ‘या’ मागण्यांसाठी महामोर्चा; आझाद मैदानात उसळला जनसागर !

लिंगायत समाजाचा ‘या’ मागण्यांसाठी महामोर्चा; आझाद मैदानात उसळला जनसागर !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 30, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : संपूर्ण राज्यभरातून मुंबईच्या आझाद मैदान येथे लिंगायत समाज एकत्र आला आहे. राज्य सरकारच्या विरोधात लिंगायत समाजाने आज महामोर्चाचे आयोजन केले आहे. लिंगायत समाजाला धर्माची मान्यता मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मुख्य मागण्यांसह इतर आपल्या काही मागण्या घेऊन या आयोजन करण्यात आले आहे.

संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारायची, बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्त्यव्य !

▶ राज्यभर 22 वेळा मोर्चे काढले

आधीही याच मागण्यांसाठी लिंगायत समाजाकडून जवळपास 22 वेळा मोर्चे काढण्यात आले होते. मात्र एवढ्या वेळा मोर्चे काढूनही सरकार आपल्याकेड दुर्लक्ष करत असल्याने लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात. त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान येथे लिंगायत समाजाचा महामोर्चा काढण्यात आला आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा, गुजरात आंध्र प्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये लिंगायत बांधव सहभागी झाले आहेत. लिंगायत समाजातील पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी समाजाला अल्पसंख्याक म्हणून स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदने दिले होते. मात्र, अद्याप त्याची दखल घेतली गेली नाही. या मागणीसाठी समाजातील काही संघटना पुन्हा मोर्चाच्या तयारीत असून, मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

▶ गेल्या आठवड्यात शिष्टमंडळासोबत चर्चा

गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. मात्र अद्याप लेखी आश्वासन न मिळाल्याने लिंगायत समाज रस्त्यावर उतरला आहे. या मोर्चात लिंगायत समाजातील खासदार आणि आमदार देखील सहभागी होणार असणार असल्याची माहिती आहे. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी, केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरू शिष्याच्या नात्याला कलंक; शिक्षकाकडून मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत गैरकृत्य..

▶ लिंगायत समाजाच्या मागण्या

▶ लिंगायत समाजाला धर्म म्हणून संविधानिक मान्यता द्यावी.
▶ लिंगायत सामाजाला अल्पसंख्यांक दर्जा द्यावा.
▶ मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचं काम त्वरित सुरू करावे.
▶ मुंबईत विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वराचा अश्वारूढ पुतळा उभारावा.
▶ महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.
▶ राष्ट्रीय जनगणनेत लिंगायतांसाठी स्वतंत्र रकाना करावा.
▶ लिंगायत सामाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह बांधून द्यावे.

या मागण्यांसाठी आजपर्यंत अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभर २२ महामोर्चे झाले. मात्र, सरकारकडून या मागण्या मान्य ना झाल्यामुळे पुढील टप्पा म्हणून रविवारी आझाद मैदान, मुंबई येथे राज्यव्यापी लिंगायत महामोर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleगुरू शिष्याच्या नात्याला कलंक; शिक्षकाकडून मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत गैरकृत्य..
Next Article केंद्रातील मोदी सरकारने अपंगांच्या विविध रखडलेल्या मागण्या पूर्ण न केल्यास दिल्लीतील संसद भवनावर अपंगांचा मोर्चा काढू – खासदार सुप्रियाताई सुळे
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.