Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » रोड रोमिओंचा योग्य पध्दतीने बंदोबस्त करणार – पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

रोड रोमिओंचा योग्य पध्दतीने बंदोबस्त करणार – पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 1, 2023Updated:February 2, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड पोलीस स्टेशन येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सहविचार सभा

महालोकवाणी न्यूज

जामखेड तालुका प्रतिनिधी धनराज पवार

जामखेड :-2 फेब्रुवारी 2023
शिक्षक व पोलीस यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांचे हित सर्वांनी जपावे व गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही पोलीस विभागामार्फत करण्यात येणार आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शिक्षक- पोलीस कटिबद्ध राहू ,शाळा महाविद्यालय व पोलीस विभाग यांचे समन्वय करून विद्यार्थ्यांची सुरक्षा नक्की वाढणार आहे ,महाविद्यालय शाळा यांच्याकडून येणारा सूचनेचे पोलीस विभागामार्फत दाखल घेतली जाणार आहे व गैरवर्तन करणाऱ्या कडक कारवाई केली जाणार आहे.
असे मार्गदर्शन पोलीस विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे संदर्भात सभेत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.

आता लालपरी चालवणार ‘ती’; लवकरचं राज्यात पहिल्यांदा महिला चालवणार ST बस !

जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील महाविद्यालये व शाळा यांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची विद्यार्थींनींच्या छेडछाड व सुरक्षेच्या उपाय योजना तसेच रोड रोमिओं चा बंदोबस्त करणे , रॅगिंग, विद्यार्थी शिस्त संदर्भात जामखेड पोलीस स्टेशनमध्ये सहविचार सभा घेतली.

या बैठकी मध्ये पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी संबोधित करताना सर्व शाळा व महाविद्यालयात CCTV असणे गरजेचे आहे जेथे CCTV नसतील त्यांनी तात्काळ बसवून घ्यावेत, 18 वर्षाखालील लहान मुलांना टू व्हीलर वाहन शाळेमध्ये आणण्यास मनाई करावी व त्यांचे प्रबोधन करावे.शाळा भरताना व सुटताना गेटवर आपले शिक्षक नेमावे व पोलीस विभागामार्फत शाळा सोडताना व भरताना पेट्रोलिंग केली जाणार आहे. बेशिस्त काही घटना घडत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन ला कळवावे. शाळे मध्ये पोलीस स्टेशन चा नंबर सर्वांना दिसेल असा स्पष्ट भाषेत लावावा. विद्यार्थी विद्यार्थिनी साठी सुरक्षा बाबत मार्गदर्शन उपक्रम

कोणत्याही परिस्थितीत मला अटक होणार, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान- म्हणाले, “केंद्रातील..!

आयोजित करावेत. वाहतूक पोलिस विभागा मार्फत वाहतुकीचे नियमाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शालेय पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन करणे
अशा विविध विषयांवर बैठकी मध्ये विद्यार्थांच्या संदर्भातील समस्या जाणुन घेऊन चर्चा करुन योग्य ते मार्गदर्शन केले आहे.


या वेळी प्रमुख उपस्थिती जामखेड महाविद्यालय प्राचार्य श्री डोंगरे एम एम ,ल ना होंशिग चे प्राचार्य श्रीकांत होशिंग , रयतचे श्री नागेशविद्यालय प्राचार्य मडके बी के , कन्या मुख्याध्यापिका चौधरी के डी खर्डा इंग्लिश स्कूलचे उगले एस आर, अरण्येश्वर अरणगावचे रमेश वराट , अणखेरी फक्राबाद विद्यालय चे कोपनर डी पी , सावंत एन एन, जोरे बी डी , गायकवाड ए ए,श्रीम जोगदंड ए व्ही, शिंदे पी बी,पारखे एस एन, शिरसाठ ए एस , डॉ अण्णा मोहिते, वणवे एच एम, ठाकरे एस बी,म्हस्के एन आर, देडे ए के, मयुर भोसले,मोहिते डी व्ही, प्राचार्य, शिक्षक, एनसीसी ऑफिसर, क्रीडा शिक्षक उपस्थित होते. मिटिंगचे आयोजन गुप्तवार्ता विभागाचे पोलीस नाईक अविनाश ढेरे यांनी केले होते
जामखेड तालुक्यातील सर्व विद्यालयाच्या प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक यांनी पोलीस विभागाचे अभिनंदन करून या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यालयांना शिस्ती संदर्भात नक्कीच फायदा होणार आहे असे मनोगत व्यक्त केले.तसेच तालुक्यातील जामखेड खर्डा ,नान्नज ,जवळा ,आरणगाव ,हळगाव ,साकत ,फकराबद ,असे महाविद्यालय व शाळा यांचे सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक हजर होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआता लालपरी चालवणार ‘ती’; लवकरचं राज्यात पहिल्यांदा महिला चालवणार ST बस !
Next Article निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच सुधीर तांबे स्मशानभूमीत, गमावला जवळचा सहकारी ..!
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.