महालोकवाणी न्यूज: दि. 12 फेब्रुवारी 2023
जामखेड तालुका प्रतिनिधी धनराज पवार
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा.रेखाताई ठाकूर यांच्या सुचनेनुसार मा.प्रा.किसन चव्हाण (सर) उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील भटके विमुक्त,आदिवासी,विविध सामाजिक संस्था संघटना,व भटके विमुक्त आदिवासी समाजातील विविध सामाजिक परिवर्तन राजकीय सत्ता ,आर्थिक,शैक्षणिक त्याचबरोबर गायरान जमीन,कल्याणकारी योजना,भटके विमुक्त आदिवासी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दि.
हे पण वाचा
Daund|दौंड हादरलं..राहत्या घरात पती पत्नीचे मृतदेह आढळले..!
11फेब्रुवारी पासून औरंगाबाद,जालना,परभणी लातूर,हिंगोली, उस्मानाबाद,बीड,अश्या दौऱ्याची सुरुवात झाली या दौऱ्यास भटके विमुक्त व आदिवासी समाजातील उत्तम प्रतिसाद लाभत आहे अशी माहिती तुकाराम पवार आदिवासी कार्यकर्ते यांनी दिली

वंचित बहुजन आघाडी प्रणित भटक्या विमुक्त आदिवासी समन्वय समितीच्या वतीने परतुर जिल्हा.जालना या ठिकाणी रात्री साडेसात वाजता आदिवासी तसेच भटके विमुक्तांच्या वस्तीवर छोट्याखानी मेळावा पार पाडला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व आदिवासी भटके मुक्त समन्वय समितीचे मुख्य समन्वयक मा.प्रा.किसान चव्हाण (सर) व भटके विमुक्तांचे राज्य समन्वयक मा.ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव व प्रा.विष्णू जाधव तक्रार निवारण समिती प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व आदिवासी भटक्या विमुक्त समूहातील महिला पुरुष युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ॲड.डॉ.सुरेश काळे,जालिंदर चव्हाण,वंचित बहुजन आघाडीचे परतूर तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्ते उपस्थित होते.
