Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला असून सुद्धा भाजपाने गिरीश बापटांना मैदानात का आणले..! भाजपची सीट धोक्यात?

डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला असून सुद्धा भाजपाने गिरीश बापटांना मैदानात का आणले..! भाजपची सीट धोक्यात?

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 17, 2023Updated:February 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

केसरीवाड्यातील बैठकीत गिरीश बापट बुधवारीआले तेव्हा त्यांच्या नाकात ऑक्सिजनची नळी होती. व्हिलचीअरवर बसून त्यांना आणण्यात आले. यावेळी अंग थरथरत होते. यावेळी बोलताना खासदार म्हणाले की, गेली तीन महिने प्रकृती बरी पण मी खूप कमी काम केलंय. मला दोन ते तीन वेळा डायलिसिस आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिलाय. या निवडणुकीत मी वैयक्तिकरित्या फिरून प्रचार करू शकणार नाही.

महिलांना अश्रू अनावर

केसरी वाड्यात गिरीश बापट बैठकीला हजर झाले. बैठक भावनिक झाली होती. व्हिलचेअरवर असलेल्या बापट यांनी छोटे भाषण केले. ते ऐकताना पदाधिकारी गंभीर झाले होते. गिरीश बापट यांचे भाषण सुरू असताना महिलांना अश्रू अनावर झाले.

काय आहे बापट यांचे महत्व

भाजपने टिळकांच्या कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे कसबा पेठेत ब्राह्मण समाजात तीव्र नाराजी आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी गिरीश बापट यांची भेट घेतली त्यानंतर बापट मैदानात उतरले. बापट या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे

पुण्यात कसबा आणि लढाई आता प्रतिष्ठेची बनली आहे. महाविकास आघाडीकडून कसब्याच्या जागेवर काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलाय. तर भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आलीय. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात यावी, टिळक कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे कसब्यातील राजकीय घडामोडी चर्चेत आल्या होत्या. आता गिरीश बापट मैदानात उतरल्याचा फायदा भाजपला किती होणार हे मतमोजणीला स्पष्ट होणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची जखमी अवस्थेत असणाऱ्या वृद्धास मदत
Next Article पाईपलाईन रोडवरील आयोध्यानगरीत किर्तन सोहळ्याला भाविकांची गर्दी ..! महादेवांपासूनच वारकरी सांप्रदायाची सुरुवात झाली-हभप सिद्धनाथ मेटे
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.