Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाईपलाईन रोडवरील आयोध्यानगरीत किर्तन सोहळ्याला भाविकांची गर्दी ..! महादेवांपासूनच वारकरी सांप्रदायाची सुरुवात झाली-हभप सिद्धनाथ मेटे

पाईपलाईन रोडवरील आयोध्यानगरीत किर्तन सोहळ्याला भाविकांची गर्दी ..! महादेवांपासूनच वारकरी सांप्रदायाची सुरुवात झाली-हभप सिद्धनाथ मेटे

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 17, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

नगर – पंढरीची पहिली वारी महादेवांनी केली. धर्म शास्त्रात योग-याग, जप, अनुष्ठान असे देव प्राप्तीचे अनेक खडतर मार्ग आहेत. पण देव प्राप्तीचा सोपा मार्ग हा नामस्मरण आहे. महादेवांपासूनच वारकरी सांप्रदायाची सुरुवात झाली आहे, असे निरुपण हभप सिद्धनाथ मेटे महाराज यांनी केले.


पाईपलाईन(Piplineroad) रोडवरील श्रीराम चौकात आयोध्यानगरीत महाशिवरात्री उत्सवानिमित्त सुरु असलेल्या सप्ताहात किर्तन सोहळ्यात हभप सिद्धनाथ मेटे महाराज यांचे किर्तन झाले. यावेळी भाविकांची गर्दी होती. किर्तनात हार्मोनियम वादक दत्तात्रय खांदवे, पखवाज वादक हभप ठाणगे महाराज, गोरक्षनाथ महाराज दुतारे व टाळकर्यांनी साथ दिली.
हभप मेटे महाराजांनी भगवान शिवशंकराच्या अनेक लिला आपल्या किर्तनातून सांगितल्या. महाशिवरात्रीचे महत्व सांगून महादेव हा भोळा आहे, पण त्यांच्या नामस्मरणाने कळी-काळालाही जिंकण्याची ताकद आहे. महादेवाचं मंदिर नाही, असे एकही गाव आपल्या देशात सापडणार नाही. पंढरपूरच्या विठूरायाप्रमाणेच हिंदू धर्मात देव-देवतांचे प्रत्येक गावात मंदिरे आहेत. यामुळे आपली संस्कृती टिकून राहते. पंढरपुरच्या वारीत माऊलींच्या सोहळ्याला मोठी परंपरा आहे. त्याप्रमाणे हनुमान जयंती, रामनवमी, महाशिवरात्री उत्सवाला खूप मोठी परंपरा महत्व असल्याचे त्यांनी शिव महापुराणातील दाखले देत स्पष्ट केले.


महादेवांनी भास्मासुराला वर दिला व त्यानंतरही भस्मासुराची झालेली फजिती याबाबत त्यांनी सविस्तर वर्णन करुन किर्तन सोहळ्यात रंग भरला होता. महादेव प्रतिष्ठानचे शंतनू पांडव, शिवाजी लगड, दिनेश कुलकर्णी, दिनकर थोरात आदिंनी सप्ताहातील हरिपाठ, किर्तनाचे योग्य नियोजन केले. याबद्दल भाविकांनी सर्वांना धन्यवाद दिले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleडॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला असून सुद्धा भाजपाने गिरीश बापटांना मैदानात का आणले..! भाजपची सीट धोक्यात?
Next Article नगरसेवक सुनील त्र्यंबके यांची अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदी निवड
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.