जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाला शिवसेना नावासह “धनुष्य बाण ‘ चिन्ह मिळाले असून आज रोजी जामखेड शहर शिवसेनेच्या वतीने खर्डा चौक येथे तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून
आनंदोत्सव साजरा केला.

या प्रसंगी शहराध्यक्ष देविदास भादलकर, युवा सेना तालुका प्रमुख सुमित वराट, मुस्तफ़ा शेख मेजर, हसनभाई तांबोळी ,मोहसिन सय्यद, सुधाकर समुद्र , महादेव कोल्हे, अमोल खेत्रे,बालाजी निमोणकर ,अरुण तांबे,विजय गौड,साहिल मुजावर,अनिकेतबिडकर, साहिल शेख,अल्तमश शेख,नेहाल आतार,जुनेद बागवान,मोहसिन कुरेशी,यासीर सय्यद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया:- प्रा.कैलास माने (सर) तालुका प्रमुख – शिवसेना जामखेड तालुका

वंदनीय हिंदूह्रदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या विचारांचा तसेच सर्व सामान्य कार्यकर्यांचा हा खरा विजय तसेच राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे हे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवतील असा विश्वास व्यक्त केला.
