Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » चिंचपूर पांगुळ येथील वामनभाऊ विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न

चिंचपूर पांगुळ येथील वामनभाऊ विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniMarch 9, 2023Updated:March 9, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील श्री वामनभाऊ विद्यालयामध्ये शालेय वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम आज (ता.९) मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य दिलीप गोरे, एकलव्य शिक्षण संस्थेचे समन्वयक एस.पी.तुपे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अहमदनगर जिल्हा परिषद सदस्या प्रभावती प्रतापराव ढाकणे यांनी भूषविले. तसेच या कार्यक्रमाला मा.नगराध्यक्ष रत्नमाला उदमले आरतीताई निर्हाळी,आदिनाथ बडे,,जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक सापते सर,डॉ राजेंद्र खेडकर,गोविंद बडे,नवनाथ सातपुते,मीरा बडे,अश्विनी साळुंके,मीना पालवे,मंगल वायभासे,शिवाजी गीते,त्रिंबक कराड, विद्यार्थी, सर्व शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक, कला, क्रीडा,वक्तृत्व स्पर्धा व शैक्षणिक क्षेत्रातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे वार्षिक बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी विद्यर्थानी लिहिलेल्या निवडक लेख,कविता,यांचे संपादन करत अंकुर हस्तलिखित चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
साधारणत: शाळेतील ७० विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.यावेळी श्री तुपे यांनी विदयार्थ्यांना थॉमस एडिसन याचें उदाहरण देऊन तुम्हीही जीवनात कितीही वेळा संकटे आली तरी हार न मानता जीवनामध्ये आगेकूच करत राहावी असा मौलिक सल्ला देत मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे श्री गोरे यांनी विद्यार्थ्यांना अवांतर वाचन करावे त्यातून आपला भौतिक विकास होण्यास मदत होते असे बोलतांना सांगितले.

सौ प्रभावती ढाकणे यांनी विद्यार्थांचे कौतुक करतांना म्हटले की शाळेतील मुलींची संख्या व प्रगती पाहून आपण भारावून गेले आहे. विद्यालयाने केलेल्या अंकुर हे प्रयोजन खूपच उत्कृष्ट नमुना आहे.
या परिसरातील विदयार्थी अनंत अडचणीवर मात करून ज्ञानार्जन करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे.
येथील विद्यालयाचे मुख्याद्यापक,शिक्षक यासाठी मेहनत घेत आहेत हे कौतुकस्पद आहे.
विविध स्पर्धा मध्ये बारगजे कृष्णा, गोकुळ बडे,प्रतीक्षा वणवे,राजगुरू साक्षी,राजगुरू धनंजय,नागरगोजे अनिल,ढाकणे कांचन,ढाकणे मीरा,सृष्टी बडे,मोहिनी बडे,आरती बडे,वैष्णवी वाघमारे,बारगजे कृष्णा, ओमकार बडे,केदार आदित्य,पालवे प्रतीक्षा, ढाकणे भगवान,बडे ज्ञानेश्वरी आदी विद्यार्थांनी सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्रसह बक्षिसे मिळवले.
सूत्रसंचालन विद्यालय शिक्षिका आशा गर्जे व सनी मर्दाने सर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक कैलास नरोडे यांनी केले.तर वार्षिक अहवाल वाचन सोमनाथ जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन बाळासाहेब दहिफळे यांनी केले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleDaund|दौंड मध्ये अनेक रेल्वे गाड्यांना थांबा नाही मग रेल्वे नेमकी, कोणासाठी – खासदार सुप्रिया सुळे
Next Article राजकीय व सामाजिक क्षेत्रात गरुडझेप घेणाऱ्या आमदार निलेश लंके यांचा आज वाढदिवस..! विविध कार्यक्रमांचे आयोजन
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.