Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महसूलमंत्र्याच्या जिल्ह्यातच अवैध वाळूची बेसुमार वाहतूक सुरू.!

महसूलमंत्र्याच्या जिल्ह्यातच अवैध वाळूची बेसुमार वाहतूक सुरू.!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 23, 2023Updated:March 23, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख ) दि.23/3/2023

गौण खनिज उत्खननाची सरकारकडुन कुठलीही परवानगी नसताना देखील मराठवाड्यातील अवैद्य वाळु वाहतूक ही अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातुन सुरू असून ज्या हायवा किंवा टिप्परमधून वाहतूक करण्यात येते ती सर्व वाहने विना नंबरची धावत आहेत. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर नेमके कोणत्या वाहनाला जबाबदार धरायचे असा प्रश्न निर्माण होत असून महसूल व पोलीस विभागाबरोबरच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा देखील एकप्रकारे बेकायदेशीर वाळू वाहतुकीला हातभार लागत असल्याचे चित्र सध्या शेवगाव तालुक्यात सर्वत्र दिसत आहे.

वाळू माफिया वाहतूक करताना कारवाई टाळण्याच्या उद्देशाने विना नंबर वाहने वापरतात. या विना नंबर वाहनांवर पोलीस प्रशासन कसल्याही प्रकारची कारवाई करत नाही. सदरील वाळू वाहतूक रात्री ११ ते पहाटे ७ च्या दरम्यान करण्यात येत असून या वेळेत अपघात होण्याची जास्त शक्यता असते. शिवाय वाहनचालक लोकवस्ती आल्यानंतर वेगाने वाहन चालवतात. शिवाय सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी देखील असते. तशा वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सदरील अवैद्य वाळु वाहतूक ही शेवगाव तालुक्यातील हातगाव, मुंगी, सुकळी, शेकटे, बोधेगाव, बालमटाकळी परिसरातून मोठ्या प्रमाणात चालु आसुन मराठवाड्यातील गोदापात्रातुन तीचा उपसा करून वाळूची खुलेआम विक्री केली जाते. नगर सरहद्दी लगत मराठवाड्यात गोदावरीचे विस्तीर्ण पात्र आहे. या भागात वाळु पट्ट्याचे लिलाव बंद आसल्याने, अवैध वाळु वाहतुक बोकाळळी आसुन वाळुचा दर ब्रास मागे हजाराने वाढुन १० ते १५ किलोमीटरच्या आंतरावर ९ ते १० हजारावर गेला आहे. काही किलोमीटरच्या अंतरावर मालक वाहतूक करणाऱ्या वाळूच्या गाड्यांची खबरदारी घेण्यासाठी पुढे-मागे चालताना दिसून येत असल्याचेही चित्र या परिसरात पहावयास मिळत आहे. तर हिच वाहतुक तालुका, जिल्हा पातळीवर दुपटीच्या पुढे गेली आहे. याच कारणाचा अवैध वाळु वाहतूक करणारे फायदा करुन घेत आहेत. परंतु हे चालते कसे ? याबाबत तर्क वितर्काना उधान आले आसुन, या वाहतूकीसंदर्भात प्रश्न चिन्ह उभे केले जात आहे.

हा प्रकार गेली कित्येक दिवसांपासून सुरु असून बेसुमार वाळू वाहतुकीमुळे या भागात अनेक अपघात घडलेले आहेत. यास प्रतिबंध करण्यासाठी महसूल प्रशासन पुढे येऊन धजावत नसल्याने वाळू तस्करांचे चांगलेच फावले जात आहे. मराठवाड्याच्या गेवराई तालुक्यातील बोरगाव ( जुने ), बोरगाव, कुराणपिंप्री, गुंतेगाव, पाथरवाला, राक्षसभुवन, सुरळेगाव तसेच शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील नदी पात्राच्या हद्दीतुन ही वाळू उपसली जात असल्याचे नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. सर्वजण झोपले की रात्रीच्या वेळी नद्यांमध्ये वाळू तस्करांची टोळी उतरुन सकाळपर्यंत वाळूची वाहतूक चालते.

आत आणि बाहेर वाळुमाफियांची यंत्रणा…!

रात्रीच्या वेळी वाळू चोरी करत असताना महसूल पथक व पोलीस कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर अचूक लक्ष ठेवण्यासाठी वाळूमाफियांची यंत्रणा रात्रभर सक्रिय होऊन पाळत ठेवत असते. त्यांना प्रत्येकी हजार रुपये रोज दिला जातो. नदी पात्रातून वाळूची वाहतूक करते वेळेस वाहनाच्या मागे आणि पुढे विना नंबरच्या चार चाकी गाड्या असतात त्यामुळे कारवाई होण्याआधीच वाहने पळवून नेऊन लपविले जातात. तर यामधीलच काही यंत्रणेला महिन्याच्या पाच तारखेला रसद म्हणून रिचार्ज मारला जातो.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleT20 मध्ये सुपरहिट मात्र ODI मध्ये सुपर फ्लॉप; सूर्यकुमार यादव तीन सामन्यांमध्ये सलग तीन वेळा शून्यावर बाद !
Next Article राज ठाकरेनी आदेश देताच प्रशासनने केली या ठिकाणी मोठी कारवाई; दुसरीकडे राज ठाकरे विरोधात पोलिसात तक्रार.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.