Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सिल्लोड मध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम; 18 पैकी 13 ग्राम पंचायतीवर दणदणीत विजय !

सिल्लोड मध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम; 18 पैकी 13 ग्राम पंचायतीवर दणदणीत विजय !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 20, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.20, सिल्लोड तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 18 पैकी 13 ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच निल्लोड येथील 11 पैकी शिंदे गटाचे 7 उमेदवार निवडणूक आल्याने येथे शिंदे गटाचा उपसरपंच पदासाठी मार्ग मोकळा झाला आहे. एकूण 147 ग्राम पंचायत सदस्य पैकी शिंदे गटाच्या जवळपास 110 ग्राम पंचायत सदस्यांचा दणदणीत विजय झाला.

ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर होताच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशे वाजवीत एकमेकांना पेढा भरवून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शिंदे गटाच्या घवघवीत यशाबद्दल मतदार बांधवांचे आभार मानले.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा.गाढे , माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, पांडुरंग दुधे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन, शंकरराव खांडवे, आसिफ बागवान, शेख बबलू, सतीश ताठे, धैर्यशील तायडे, संजय मुरकुटे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शिंदे गटाच्या 18 पैकी 13 ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या ग्राम पंचायती व नवनिर्वाचित सरपंच खालील प्रमाणे !

कासोद धामणी :- दत्तात्रेय काशीनाथ राकडे (शिंदे गट) बोरगाव बाजार :-सत्तार बागवान (शिंदे गट ) सारोळा :- मोहन गायकवाड (शिंदे गट ) जाभंई:- लक्ष्मीबाई नारायण शिंदे (शिंदे गट) रेलगाव :-पंकज जैस्वाल (शिंदे गट) खुल्लोड :- स्वाती भागवान भोरकडे (शिंदे गट) जळकी बाजार :- ज्ञानेश्वर मधुकर दांडगे (शिंदे गट) मोढा खुर्द :- लक्ष्मण सखाराम कल्याणकर (शिंदेगट) , पिंपळगाव पेठ:- दिलीप जाधव (शिंदे गट), पिंपळदरी:-पूजा माहोर (शिंदे गट), चारनेर/चारनेर वाडी:-रवींद्र बिलवाल, (शिंदे गट) शिंदेंफळ:- रेखाबाई अक्कलकर (शिंदे गट) , मोढा बु:- वर्षा हावळे (शिंदे गट)

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे – फडणवीस सरकारने वर्चस्व !
Next Article दौंड तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार राहुल कुल गटाची पाच जागेवर सरशी
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.