पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे
दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकही सार्वजनिक मुतारी नसल्यामुळे दौंड शहरात येणाऱ्या व शहरातील लोकांची
लघुसंखेची सोय नसल्यामुळे.दौंड शहरामध्ये पोलीस उपाधीक्षक कार्यालय व पोलीस निरीक्षक कार्यालय या दोन्ही कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर म्हणजे पन्नास फुटावर असलेली.जुनी पोलीस वसाहत या पोलीस वसाहतीचा सार्वजनीक मुतारी म्हणून वापर सर्रास केला जात आहे.
त्यामुळे येथे अतिशय दुर्गंधी पसरली असून डासांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य झालेले आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रोगराईचा मोठ्या प्रमाणात फैलाव होवू शकतो त्यामुळे दौंड शहरामध्ये।सार्वजनीक मुतारीची सोय .नसल्यामुळे फार मोठा चर्चेचा विषय बनला आहे. नगरपालिकेने नवीन रस्त्यांच्या कामासाठी चार ते पाच मुताऱ्या पाडल्यानंतर पर्यायी सोय केली नाही त्यामुळें नागरीकांचे अतोनात हाल होत आहेत.
त्यामुळे महिला वर्गामध्ये प्रचंड नाराजी पाहिला मिळत आहे. मुतारी साठी नागरिकांना हॉटेल. दवाखाने .शासकीय, कार्यालयात जावे लागत आहे .हिच खरी फार मोठी शोकांतिका आहे .या संदर्भात दौंड नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ राशिनकर मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही .
