Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ajit pawar|अजित पवार भाजपसोबत जाणार ? हा दावा कितपत खरा.!

Ajit pawar|अजित पवार भाजपसोबत जाणार ? हा दावा कितपत खरा.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 14, 2023Updated:April 14, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

गेल्या 2 दिवसांपासून राजकीय वर्तुळातली चर्चा अजित पवारांच्या (Ajit pawar) अवतीभवती फिरतेय. सत्तासंघर्षाचा निकाल जवळ आलाय आणि त्याचपार्श्वभूमीवर अजित पवार भाजपसोबत जाणार का? अशा चर्चा आणि दावे सुरु झाले. पण खरंच असं काही होण्याची शक्यता आहे का? याबाबत विचार करणं महत्त्वाचं आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आमदार अपात्र होणार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार, असा दावा केला. त्यानंतर पुन्हा केंद्रस्थानी अजित पवार आले आहेत. हाच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही पत्रकारांनी विचारला, पण पवारांनी न बोलणंच पसंत केलं. सत्तासंघर्षाच्या निकाल कधीही येऊ शकतो. ती तारीखही जवळ येतेय आणि त्यामुळं शक्यता आणि चर्चेला ऊत आलाय. समजा सुप्रीम कोर्टाच्या निकालानं शिंदेंचं सरकार कोसळलंच तर अजित पवार पुन्हा भाजपचं सरकार आणू शकतात का? पण खरंच अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात का? आणि समजा अजित पवारांनी जायचं ठरवलं तरी ते त्यांच्यासाठी शक्य आहे का? हाही मुद्दा आहे.

अजित पवारांनी भाजपला पाठींबा द्यायचं ठरवलंच. तर त्यांच्यासोबत तेवढे आमदार असणं आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे सध्या 53 आमदार आहेत आणि कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी 2 तृतीयांश आमदार फूटणं आवश्यक आहे. 53 आमदारांची 2 तृतीयांश संख्या म्हणजे 36 आमदार होतात. त्यामुळं अजित पवारांना 36 आमदारांना सोबत घ्यावं लागेल. एकट्या अजित पवारांनी भाजप सोबत येऊन काहीही होणार नाही.

अजित पवारांकडे गटनेते पद नाही

2019च्या निकालानंतर अजित पवार फडणवीसांसोबत गेले, त्यावेळी ते स्वत: गटनेते होते. त्यांनी गटनेते या नात्यानं समर्थनाचं पत्र राज्यपालांना दिलं होतं. आता विधिमंडळाचे गटनेते हे अजित पवार नाही तर जयंत पाटील आहेत. त्यामुळे आमदार फोडणं अजित पवारांसाठी प्रचंड कठीण आहे.

असं असलं तरी तिसऱ्या शक्यतेवरुन चर्चा रंगलीय. जर सत्तासंघर्षाच्या निकालानंतर सरकार पडलं तर अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन पुन्हा भाजप सत्तेत येऊ शकते. म्हणजेच ज्या प्रमाणं भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं त्याच प्रमाणं अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली जाऊ शकते. पण त्यासाठी अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 36 आमदारांची साथ लागेल, असं झालं तर भाजपच्या मदतीनं अजित मुख्यमंत्री होतील आणि भाजप पुन्हा सत्तेत येईल.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसर्वांना चहाचं वेड लावणारा ‘उपसरपंच चहा’; जामखेडमधील पाडळी फाटा येथे ‘या’ शाखेचे शानदार उद्घाटन !
Next Article पाणी येत नाही असा नागरिकांचा फोन ; अडचणी समजून पाणी प्रश्न लावला मार्गी – नगरसेवक सुनील त्र्यबंके
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.