जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार
आपल्या देशाचे संरक्षण करीत असताना जे सैनिक धारातिर्थी पडले त्यांच्या कुटूंबियांना,जे अपंग झाले त्यांचे पुनवर्सनासाठी तसेच आर्थिक बाबतीत गरीब असलेल्या माजी सैनिकांना त्यांचे सैन्य निवृत्ती पश्चात दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे.यासाठी विविध आर्थिक मदतीसाठी आपल्या संस्थेच्या कर्मचा-्यां चे सहकार्याने.

या शुर सैनिकांबद्दल वाटणारे प्रेम या निधी सशस्त्र सेना ध्वज दिन वर्ष २०१९ – व वर्ष २०२० चा प्रलंबित निधी ४,२४,३०५ रुपये रक्कम दि.२० एप्रिल २०२३ रोजी ध्वज निधी जमा करून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहमदनगर येथे जमा करण्यात आलेला आहे. त्याबद्दाल जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी गट शिक्षणा धिकारी पंचायत समिती जामखेड यांना दि.११ मे 2023 रोजी पत्र देवून निधी संकलना बद्दल अभिनंदन पत्र दिलेले आहे.
याबद्दल ग टशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी , विद्यार्थी ,शिक्षक , मुख्याध्यापक , केंद्र प्रमुख ,विस्तार अधिकारी कार्यालयीन कर्मचारी, साधन व्यक्ती (विषय तज्ञ ) यांचे अभिनंदन केले. तसेच जिल्हा कल्याण कार्यालयाकडून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचे अभिनंदन करण्यात आले.
