जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
आज रोजी जामखेड शहरातील युवा नेते अनिल पाटील यांनी व त्यांच्या सहकारी मित्र परिवाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला असून अनिल पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जामखेड शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच निवडीचे पत्र तालुक अध्यक्ष प्रदिप (भाऊ) टापरे , मनसे नेते पै.दादासाहेब (हवा) सरनोबत,तालुका उपाअध्यक्ष सनि सदाफुले यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी अनिल पाटील म्हणाले की,
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थीती खुप दऴभद्री व निर्लज्ज अशी झाली आहे, कुणी Ed घाबरुन पक्ष बदलतोय तर कोण स्वःताच्या स्वार्थासाठी तर सर्वसामान्य जनतेबद्दल कोणाला काही देण घेणे राहिले नाही. आशा वेऴी एकमेव महाराष्ट्राच्या हितासाठी झगडणारे नेते राजसाहेब ठाकरे विचारांनुसार पुढील काऴात मनसेच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भर पडावी यासाठी कार्य करण्यास आम्ही तयार आहोत .मी व माझे सहकारी मित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य व काम करत होतो आणि करणार आहोत.
याप्रसंगी केतन गर्जे, सागर घुमरे, शुभम राऊत, रितेश जाधव, आशिष पंडित, विजय काळे, तुषार काळे, ओंकार राऊत,पै.बाला साठे, सचिन डोंगरे, राहुल लहाने, अनिकेत टेकाळे, प्रशांत काळे, शुभम उदारे ,अशोक सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👇💥
Gautami Patil गौतमी पाटील आपल्या निर्णयावर ठाम; कार्यक्रमाबाबत घेतला हा महत्वपूर्ण निर्णय.!