नगर _ जिल्हा परिषद अहमदनगर येथील माध्यामिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस व अधिक्षक सत्यजित मच्छिंद्र यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक गंभीर तक्रारी आहेत यासाठी विविध संघटनांनी अंदोलने केलेली आहेत या सर्व बाबींची दखल घेऊन शिक्षण आयुक्त पुणे यांनी या दोघांचा निलंबनाचा प्रास्ताव शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दिपक केसरकर यांना सादर केलेला आहे परंतु दोन महिने झाले तरी अद्याप त्यांना निलंबीत करण्यात आले नाही .

त्यामुळे शिक्षक व समाजात चुकीचा संदेश जात आहे कर्तव्यदक्ष मंत्री महोदयांनी अशा भ्रष्टाचारी अधिकार्याना पाठीशी घालणे योग्य नाही . त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसात निलंबीत करावे अन्यथा त्यानंतर केव्हांही पूर्वसुचना न देता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शालेय शिक्षण मंत्री यांना दि . ५ / ६ /२३ च्या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य कास्टॉईब कर्मचारी कल्याण कर्मचारी कल्याण महासंघाचे केंदिय अध्यक्ष एन्. एम. पवळे यांनी दिला आहे.
