Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » JEE- NEET च्या तयारीसाठी सांदिपनी ॲकॅडमी सर्वश्रेष्ठ- अभिनेते श्री. देवदत्त नागे

JEE- NEET च्या तयारीसाठी सांदिपनी ॲकॅडमी सर्वश्रेष्ठ- अभिनेते श्री. देवदत्त नागे

mahalokwaniBy mahalokwaniJune 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी ‘ माऊली संकुल ‘ झोपडी कॅन्टीन येथे ‘जय मल्हार’ या मालिकेतील खंडोबाची भूमिका करणारे सुप्रसिद्ध अभिनेते श्री देवदत्त नागे यांच्या शुभहस्ते श्री सांदिपनी ॲकॅडमीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तानाजी’ व ‘ आदिपुरूष’ या चित्रपटांतील भूमिकेमुळे श्री देवदत्त नागे हे लोकांच्या मनामनांत व घराघरांत पोहोचले आहेत

रविवारी सकाळी दहा वाजता प्रमुख पाहुणे श्री देवदत्त नागे यांचे माऊली संकुल येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे रांगोळी काढून तसेच आरती ओवाळून मोठे जंगी स्वागत करण्यात आले.

प्रमुख पाहुणे श्री देवदत्त नागे, श्री बालराजू सर, प्रभू गिरीवरधारी, श्री राहुल गुजराल सर, श्री नानासाहेब बारहाते सर तसेच प्राध्यापक पंडीत सर यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कृष्ण वंदना झाली. त्यानंतर श्री देवदत्त नागे यांच्यावर माहितीपट तसेच आदीपुरुष या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला

श्री देवदत्त नागे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या शालेय जीवनात घडलेले अनेक महत्वाचे प्रसंग सांगितले. तसेच अभ्यासाबरोबर शारिरीक स्वास्थ्य ही खूपच महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या आई वडीलांना न विसरता आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरु ठेवण्याचा सल्ला दिला. श्री सांदिपनी ॲकॅडमीचे संचालक श्री बालराजू सर यांचे शिक्षण व विद्यार्थ्याप्रती असलेले प्रेम व आस्था याचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. तसेच श्री बालराजू सर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अनमोल असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

इस्कॉन मंदिराचे प्रभू गिरीवरधारी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. श्री देवदत्त नागे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. चित्रपट क्षेत्रात असूनही ते निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे

रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी श्री सांदिपनी ॲकॅडमी तर्फे Nischay 2.0 परीक्षा आयोजित करण्यात आली होती. Nischay 2.0 या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 10,000 ते 2,00,000 पर्यंत स्कॉलरशिप तसेच 21,000 ते 51,000 रोख बक्षीस, Laptop, टॅब, स्मार्ट वॉच, ट्रॉफिस व मेडल्स यांचे वाटप करण्यात आले.

JEE Mains परीक्षेत श्री सांदिपनी ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविल्यानंतर पालक व विद्यार्थी यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सांदिपनी ॲकॅडमीचे सर्वेसर्वा श्री बालराजू सर, श्री राहुल गुजराल सर व श्री नानासाहेब बारहाते सर व सर्व स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी पालक व विद्यार्थी यांनी एकच गर्दी केली होती.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशिक्षणाधिकारी अशोक कडूस व अधिक्षक सत्यजित मच्छिंद्र याना त्वरीत निलंबित करा; अन्यथा कास्ट्राईब तीव्र अंदोलन करणार – श्री एन् एम पवळे
Next Article संगमनेरमधील ‘भगवा’ मोर्चाला गालबोट; दोन गटात दगडफेक, तणावाची स्थिती निर्माण.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.