Ahmednagar Rain Alert अहमदनगर जिल्हयात अलर्ट जारी
Ahmednagar Rain Alert अहमदनगर जिल्हा उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर राजेंद्रकुमार पाटील यांनी एक पत्रक काढले असून त्यांनी आपत्तीच्या काळात काय उपाय योजना कराव्यात तसेच कोणत्या नियमाचे पालन करावे अहमदनगर जिल्हयात अलर्ट पत्रक प्रसिद्ध केले आहे

Ahmednagar Rain Alert अहमदनगर जिल्हयातील नागरीकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान खात्याव्दारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्हयात Nagar दि. 21/07/2023 ते दि. 22/07/2023 या कालावधीमध्ये गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वा-यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच दि. 23/07/2023 ते 25/07/2023 या कालावधीमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील तमाम नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता Nagar Rain Alert घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्यात अलर्ट Ahmednagar Rain Alert जारी केला आहे मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.

अहमदनगर जिल्यात अलर्ट Ahmednagar Rain Aler गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे.
मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे.

Table of Contents
वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.

जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज आणि पाऊस यापासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा.
