Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed |जामखेड येथे सुवर्णपदक विजेता पै. सुजय तनपुरेचा भव्य नागरी सत्कार संपन्न ..

Jamkhed |जामखेड येथे सुवर्णपदक विजेता पै. सुजय तनपुरेचा भव्य नागरी सत्कार संपन्न ..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 30, 2023Updated:July 30, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सुवर्णपदक पै. सुजय तनपुरेचा जामखेड येथे नागरी सत्कार

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

जामखेड Jamkhed तालुक्यातील शिऊर या गावचा रहिवासी पैलवान सुजय तनपुरे यांनी जॉर्डन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवून देशाचे नाव उज्वल केले आहे.ही स्पर्धा २४ देशात होती त्यापैकी १७ देशाच्या स्पर्धकांनी सहभागी झाले होते.या स्पर्धेत भारत देशांकडून प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावले याबद्दल पै.सुजय तनपुरे यांचा नागरी सत्कार जामखेड तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.


या कुस्ती स्पर्धेसाठी विठ्ठल (वस्ताद) देवकाते यांच्या भैरवनाथ कुस्ती संकुल मध्ये घडलेला पट्टा असे पैलवान सुजय तनपुरे यांना मार्गदर्शन लाभले. तसेच मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पोलीस निरीक्षक महेश पाटील होते तर प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ होते.

Table of Contents

  • सुवर्णपदक पै. सुजय तनपुरेचा जामखेड येथे नागरी सत्कार

अध्यक्षीय भाषणात बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की,पैलवान क्षेत्रात राहुल आवारे व सुजय तनपुरे या दोघांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या तरुणांनी व्यसनापासून दूर राहून शरीरसौष्ठव कडे लक्ष द्यावे

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की,पैलवान सुजय तनपुरे यांनी ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्ट करून यश मिळवलेले आहे. त्याने जिद्दीने यश मिळवून जामखेड तालुक्याचे तसेच देशाचे नाव उज्वल केलेले आहे. भविष्यातही त्याला अधिकाधिक यश मिळण्यासाठी आमच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.

यावेळी बोलताना माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर म्हणाले,शासन स्तरावर आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून शासकीय मदत तसेच सेवेत रुजू करण्यासाठी प्रयत्न करु , पैलवान सुजय तनपुरे यांना यशाच्या शिखरावर पाहण्यासाठी खरा पडद्या मागचा त्यांचे बंधू विकास तनपुरे यांनी आपल्या भावासाठी पैलवानकी सोडून व्यवसाय करुन सुजय यांना आर्थिक मदत केली तसेच नागनाथ तनपुरे हे माझे वर्गमित्र असून त्यांचे चिरंजीव सुजय तनपुरे यास २१०००I- रुपये बक्षीस सुपूर्द केला.

Startup| अहमदनगरच्या स्टार्टअपचा कृषी क्षेत्रात डंका; केंद्र सरकारकडून 18 लाख रुपये निधी प्रदान


याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक महेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा मधुकर राळेभात, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, माजी सभापती गौतम आण्णा उतेकर, सभापती शरद कार्ले, मंगेश आजबे,प्रा संजय वराट सर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ,माजी सभापती डॉ भगवान (दादा) मुरूमकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा.मधुकर राळेभात, गौतम (आण्णा) उतेकर,प्रा.संजय वराट सर, मंगेश आजबे,सभापती शरद कार्ले,माजी जि.प.सदस्य सोमनाथ पाचरणे,रासपाचे विकास मासाळ,प्रहारचे नय्युमभाई सुभेदार, जालींदर चव्हाण ,डाॅ.प्रकाश कारंडे,सदाशिव हजारे, बापु शिंदे आदी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ (दादा) चव्हाण सर यांनी केले.

सुवर्णपदक विजेता पै.सुजय तनपुरे यांना पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ भगवान (दादा) मुरुमकर २१०००I- रुपये,कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम आण्णा उतेकर २१०००I-रुपये
, पंचायत समिती चे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ ११०००|- रुपये,कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती पै शरद (दादा) कार्ले ११०००I- रुपये यांच्या वतीने रोख स्वरूपात रक्कम देण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथील कांदा अनुदानास अपात्र शेतकऱ्यांना न्याय देणार; सभापती शरद कार्ले यांचे पणन मंत्र्यांना पत्र..
Next Article जामखेड मधील शिंगवी चष्माघर ठरत आहे दृष्टीहिनांसाठी दृष्टी देणारी पंढरी.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.