Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Talathi Bharti 2023 Exam : तलाठी परीक्षेत पुन्हा गोंधळ! राज्यात अनेक जिल्ह्यातचक्क सर्व्हरचं डाऊन, वाचा सविस्तर

Talathi Bharti 2023 Exam : तलाठी परीक्षेत पुन्हा गोंधळ! राज्यात अनेक जिल्ह्यातचक्क सर्व्हरचं डाऊन, वाचा सविस्तर

mahalokwaniBy mahalokwaniAugust 21, 2023Updated:August 21, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Talathi Bharti : तलाठी भरतीसाठी आयोजीत करण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परीक्षा आज (२१ ऑगस्ट) पार पडत आहे. मात्र राज्यातील संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातीस बाभूळगाव आणि कापशी येथील परीक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी सकाळी ९ ते ११ ही परीक्षेची वेळ होती. मात्र अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी बंद पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ होऊन देखील परीक्षा केंद्राबाहेरच थांबवे लागत आहे. नागपूरमध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे. नागपूर येथील बीएमव्ही महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर देखील विद्यार्थांना वर्ग खोल्यात प्रवेश मिळत नसल्याची तक्रार समोर आली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात हाच प्रकार समोर आला असून यामुळे परीक्षा केंद्रांच्या बाहेर परीक्षेसाठी (Talathi Bharti) दूरून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. ज्या कंपनीकडे या परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे त्या कंपनीकडून अद्याप विद्यार्थ्याना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये.

IND Vs IRE : बुमराहच्या नेतृत्वात पहिली मालिका जिंकली; इंडियाकडून दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा 33 धावांनी पराभव

महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी राज्यातून 10 लाख 41 हजार इच्छुकांनी अर्ज सादर केला आहे. तलाठी पदाच्या परीक्षेच्या शुल्कावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आता ऐन परीक्षेच्या वेळी मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे.

➤ अकोला जिल्ह्यातील Talathi Bharti पेपरचा खोळंबा

अकोला जिल्ह्यातील दोन्ही परिक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप. जिल्ह्यात बाभूळगाव आणि कापशी येथे दोन परिक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा होती. सकाळी 9 ते 11 ही परीक्षेचे वेळ होती. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी खोळंबली आहे. त्यामुळे अद्यापही परीक्षा केंद्राबाहेरच आहेत.

➤ नागपूरमध्येही तलाठी परीक्षेचं सर्व्हर डाऊन

नागपूरसह जवळपास सर्वच केंद्रांवर ही परीक्षा सुरू झालेली नाही. नागपूरच्या vmv महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेसाठीच्या प्रवेश पत्र हातात घेऊन उभे आहेत. मात्र त्यांना वर्ग खोल्यांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. काही ठिकाणी परीक्षार्थ्यांनी परीक्षेची व्यवस्था आणि सर्वर डाऊन झाल्याबद्दल रोष व्यक्त करत आहे.

➤ Talathi Bharti लातूरमध्ये विद्यार्थी संतप्त

महाराष्ट्रभरातून आलेले विद्यार्थी सकाळी सात वाजल्यापासून लातूरच्या परीक्षा केंद्राबाहेर हजर होते .मात्र त्यांना कोणतेही सूचना अद्यापपर्यंत देण्यात आली नाही. नऊ वाजून गेल्यानंतर सेंटरमधील कर्मचारी सांगत आहेत की काही तांत्रिक चुकांमुळे आम्ही परीक्षा पुढील सत्रात घेऊ? यामुळे यवतमाळ, हिंगोली नांदेडसारख्या भागातून आलेले विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleJio जिओने नेटफ्लिक्स वापरकर्त्यांसाठी केली मोठी घोषणा ; होणार हा फायदा..
    Next Article Jmakhed| पारधी समाजावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार – साहित्यिक नामदेव भोसले
    mahalokwani
    • Website

    Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

    SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

    massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

    ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

    sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

    Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.