श्रीकृष्ण जन्माष्टमी चे अवचित साधून जिल्हा परिषद मराठी मुले सेमी इंग्रजी या शाळेमध्ये घेण्यात आला एक अभिनव स्तुत्य उपक्रम बालगोपाळांच्या हस्ते फोडण्यात आली दहीहंडी या वेळी बालगोपाळांनी श्रीकृष्ण-राधा यांची केलेली आकर्षक वेशभूषा, दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपाळांकडून केले गेलेले
जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार

प् शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले भन्नाट डान्स या मुळे पालक, शिक्षक सर्वांनीच या उपक्रमाचा आनंद लुटला. या दहीहंडी उत्सवामध्ये पहिली ते चौथी पर्यंत च्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्यात आली होती. त्यामध्ये इयत्ता चौथी क चा विद्यार्थी चि. सुदर्शन शेळके, हा दहीहंडी फोडण्याचा मानकरी ठरला.
बालगोपालांचा दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी व त्याचा आनंद लुटण्यासाठी जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे साहेब हे यावेळी उपस्थित होते.
[better-ads type=’banner’ banner=’7208′ ]
यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री धनवे साहेब बोलताना म्हणाले की जामखेड येथील जिल्हा परिषदेची मराठी मुलांची सेमी इंग्रजी शाळा या शाळेत नेहमी वेगवेगळी आणि स्तुत्य उपक्रम राबविले जातात तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा देखील चांगला प्रतिसाद असतो शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हा दहीहंडीचा उपक्रम राबविला तो शंभर टक्के यशस्वी झाला असून या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी खूप आनंद लुटला त्याबद्दल त्यांनी सर्व शिक्षकांचे यावेळी कौतुक केले. असेच उपक्रम पुढील काळात राबवावीत व विद्यार्थांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी प्रयत्न करावे. त्याच बरोबर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व मुख्याध्यापकांना शुभेच्छा दिल्या.
[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]
बालगोपाळांच्या या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी मा. श्री. बाळासाहेब धनवे, मा. तागड मामा, मा. संतोष हापटे सर, मा. दरवडे भाऊसाहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. नासीर सय्यद (चाचु), सदस्य मा. नितीनजी टेकाळे, मा. शिवाजी येवले, मा. निलेश गायकवाड, पालक मा. मनोज डाडर, मा. अमोल भैसडे, मा. मजहर खान, मा. शंकर ठाकरे, मा. सुरज भालेराव त्याच बरोबर माता पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
बालगोपाळांच्या दहीहंडी उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मा. संजय कर्डिले सर, मा. कदम सर, मा. नितीन मोहळकर, पुंडे मॅडम, डिसले मॅडम वंदना मोरे मॅडम, धाऊड मॅडम, मोहोळकर मॅडम, म्हेत्रे मॅडम, वराडे मॅडम, साबळे मॅडम, कल्पना मोरे मॅडम, पोले मॅडम, साळे मॅडम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन मोहळकर यांनी केले तर आभार मा. सागर माकुडे सर यांनी मानले.
