Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Farmer Suicide : संभाजीनगर हादरलं! एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या, जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवशीच माहिती समोर

Farmer Suicide : संभाजीनगर हादरलं! एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या, जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवशीच माहिती समोर

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 11, 2023Updated:September 11, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Farmer Suicide : जगभरात आत्महत्या (Suicide) हा एक गंभीर प्रश्न आहे. या गंभीर समस्येबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दर वर्षी १० सप्टेंबर रोजी जागतिक ‘आत्महत्या प्रतिबंध दिन’ साजरा केला जात आहे. मात्र देशांत आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाही. अशातच आता राज्यातून एक मोठी घटना समोर आली आहे.

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) काही थांबता थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

हेही वाचा👉 : महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या या तारखेपासून मुसळधार पावसाचा पुणे हवामान विभागाचा अंदाज..

कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे (वय 48 वर्षे), फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद साहेबराव मतसागर ( वय 43 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नावं आहे.

On this World Suicide Prevention Day, I encourage you to "Stay, your story is not over." Wear teal and purple to show you care. Get this empowering shirt: https://t.co/h0sJdmutLQ #SuicidePrevention #KeepFighting #YourLifeMatters #CreatingHopeThroughAction #WSPD23 #WSPD pic.twitter.com/IIUBtPmlWf

— World Suicide Prevention Day (@wspdglobal) September 10, 2023

Table of Contents

  • शेतकऱ्याचा राहत्या घरात गळफास (Suicide)
  • शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन संपवलं जीवन (Suicide)
  • मेघराजा रुसला; बळीराजाने दिला बळी

शेतकऱ्याचा राहत्या घरात गळफास (Suicide)

कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे या शेतकऱ्याने शेतातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या( Suicide) केली आहे. ही घटना रविवारी (10 सप्टेंबर) रोजी दुपारी दोनच्या दरम्यान उघडकीस आली. त्यांनी शेतातील राहत असलेल्या घरात रविवारी दुपारी आत्महत्या केली. याची माहिती पोलिस पाटील प्रकाश पवार यांनी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिनकर बिडवे यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दिनकर यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन संपवलं जीवन (Suicide)

पावसाअभावी वाया गेलेल्या पिकाच्या नैराश्यान पीरबावडा येथील शेतकऱ्याने विषारी औषध घेतले होते. तर, संभाजीनगरच्या घाटी रुग्णालायत त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) असे शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी त्यांनी विषारी औषध प्राशन केले होते. गेल्या तीन दिवसांपासून घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी पीरबावडा येथे संध्याकाळी झाला आहे. या विषयी वडोद बाजार पोलिस ठाणे येथे आकस्मित मृत्यूची ( Suicide) नोंद करण्यात आली आहे.

मेघराजा रुसला; बळीराजाने दिला बळी

पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केलेल्या वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद मतसागर यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यातील जरूळ येथील अरविंद मतसागर यांच्याही शेतातील पिके करपून गेली आहे. नापिकीमुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या विवंचनेत असलेल्या अरविंद यांनी शनिवारी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात आल्यावर कुटुंबीयांनी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी दुपारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू ( Suicide) झाला. या प्रकरणी त्यांचे भाऊ संतोष साहेबराव मतसागर यांनी दिलेल्या माहितीवरून वैजापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article‘शिवशक्ती’ परिक्रमातून दाखवली ‘पंकजा शक्ती’ ; राज्यासह जामखेडमध्ये फुलांची उधळण करत पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत..
Next Article गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा दणका; कर्तव्यात कसूर करणारा शिक्षक नितिन बोराटे निलंबित.
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.