जामखेड तालुका हा शिक्षक संघाचा बालेकिल्ला आहे – बापूसाहेब तांबे
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड तालुका हा शिक्षक संघाचा बालेकिल्ला आहे. तसेच शिक्षकांचे अशैक्षणिक कामे, उशीरा होणारे पगार, शिक्षकांची ऑनलाईन ची इतर कामे, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी लागू करावी. त्रैवार्षिक अधिवेशनात बापूसाहेब तांबे यांनी खंत व्यक्त केली.

जामखेड शहरातील नगर रोड येथील साई गार्डन येथे प्राथमिक शिक्षक संघ , गुरुमाऊली व सदिच्छा मंडळ जामखेड तालुका त्रेवार्षिक अधिवेशन व
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक ,कै.आचार्य दादासाहेब व कै.भा. दा. पाटिल पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते.
हा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचे बुलंद नेतृत्व बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वांखाली व शिक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमांचे अध्यक्ष शिक्षक नेते राजेंद्र शिंदे हे होते.यावेळी जिल्ह्यातून शिक्षक बँकेचे चेअरमन संदीप मोटे,व्हा. चेअरमन कैलास सरोक्त,गुरुमाउली मंडळ जिल्हाध्यक्ष राजनकुमार साळवे,सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत,शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर, चेअरमन शरद सुद्रीक,नवनाथ तोड़मल,अर्जुन शिरसाठ,राजेंद्र सदगीर,संतोष दुसुंगे,
मा. व्हा. चेअ.आर टी साबळे,गहीनाथ शिरसाठ,संचालक बाळासाहेब तापकीर, सूर्यकांत काळे,स्वराज्य मंडळ जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे, शिक्षक नेते अनिल टकले,नवनाथ दिवटे,बाबा आव्हाड, भास्कर कराळे, बबन गाड़ेकर,गौतम साळवे, संतोष मगर, प्रदीप बोरुडे,दशरथ देशमुख, प्रमोद शिर्क, दरेकर सर,दत्तात्रय सिनारे,नवनाथ दिवटे,बजरंग गोडसे,अशोक घालमे,योगेश खेडकर,विजय ठाणगे,प्रशांत गवारी, राजू राऊत,सुरेश निवडूंगे, प्रकाश नागरे, मिनिनाथ देवकर, संचालक संतोषकुमार राऊत,विश्वस्त मुकूंदराज सातपूते, केशव गायकवाड, गोकुळ गायकवाड, शिवाजी हजारे, माजीद शेख, श्रीहरी साबळे,जालिंदर भोगल,बाबासाहेब कुमटकर, अर्जून पवार, राजीव मडके, संतोष भोंडवे,विकास बगाडे,शहाजी जगताप,विनोद सोनवणे, आविनाश नवसरे तसेच महिला प्रतिनिधी निशा कदम, कामिनी राजगुरू, अर्चना भोसले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व संघ व मंडळ पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यावेळी बक्षीस व पारितोषिक वितरण समारंभ उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यावेळी शिक्षक नेते श्री बापूसाहेब तांबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्र शिंदे,गोकुळ कळमकर, राजनकुमार साळवे,नारायण राऊत यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गुरुमाउली मंडळ अध्यक्ष श्री पांडुरंग मोहोळकर सर यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक संघ तालुकाध्यक्ष एकनाथ (दादा)चव्हाण व गणेश नेटके सर यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार शिक्षक नेते केशवराज कोल्हे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघ व मंडळ प्रेमी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
