Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| जामखेड येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

Jamkhed| जामखेड येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

mahalokwaniBy mahalokwaniOctober 25, 2023Updated:October 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धम्मचक्र प्रवर्तन दिन”हा भारतात साजरा केला जाणारा एक बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मियांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी, नागपूर येथे साजरा करतात. अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ७ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस “धम्मचक्र प्रवर्तन दिन” म्हणून साजरा केला जातो. आज रोजी Jamkhed जामखेड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन ( नालंदा बुध्द ,विहार) बाजारतळ येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन भारतीय बौद्ध महासभा,शाखा जामखेड च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बौद्ध धर्मातील २२ प्रतिज्ञांचे काटेकोर पणे पालन करणे – प्रा.प्रशांत चव्हाण


यावेळी आंबेडकरी चळवळीचे व्याख्याते प्रा. प्रशांत चव्हाण म्हणाले की, आंबेडकरी समाजाने बौद्ध धर्मातील २२ प्रतिज्ञांचे काटेकोर पणे पालन करणे आज काळाची गरज आहे, समाजातील अनिष्ट,रूढी, परंपरा व कर्मकांड यावर त्यांनी प्रकाश टाकून त्या दूर करण्यासाठी बौध्द अनुयायांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी व्यक्त केले.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका अध्यक्ष केंद्रीय शिक्षिका सुरेखाताई सदाफुले,ॲड. अरुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले, बापूसाहेब गायकवाड, बापूसाहेब ओहोळ,संतोष गव्हाळे, हरिभाऊ कदम गुरूजी,प्रभाकर सदाफुले, सिध्दार्थ साळवे,राजन समिंदर, राजन मेघडंबर,ज्ञानदेव साळवे, सतिश सदाफुले, सुनील जावळे,प्रा. राहुल आहिरे, विनोद सोनवणे,दादा मोरे, विनोद घायतडक,दिपक घायतडक, दादा घायतडक,अजिनाथ शिंदे आदी नगरसेविका विद्याताई वाव्हळ,सुरेखा ताई सदाफुले तसेच उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या अहमदनगर दक्षिण जिल्हा संघटक पदी निवड झाल्याबद्दल बौद्धाचार्य अशोक आव्हाड यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष भेट झालेले नान्नज येथील नारायण साळवे व मोहा येथील उत्तम जावळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौधदाचार्य अशोक आव्हाड, बलभीम जावळे,संजय वारभोग, मुकूंद घायतडक आदींनी परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने ; गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा सत्कार
Next Article जामखेड शहरात कोजागिरी पौर्णिमे निमित्त नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने ” ओपन गरबा दांडिया चे आयोजन…
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.