सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे चालू असलेल्या Athletics अँथलेटिक्स (थाळी फेक) या क्रीडा प्रकारात जामखेड महाविद्यालय जामखेड चा खेळाडूं कु. हृषीकेश राघवेंद्र धनलगडे याने विभागीय स्पर्धेत कास्य पदक मिळविले व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली या खेळाडूंला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. आण्णा मोहिते यांनी मार्गदर्शन केले.
अँथलेटिक्स (थाळी फेक) क्रीडा प्रकारात जामखेड महाविद्यालयचा डंका

या खेळाडूंची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ Athletics अँथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. उद्धव (बापू) देशमुख, उपाध्यक्ष मा. अरुण (काका) चिंतामणी, संस्थेचे सचिव मा. शशिकांतजी देशमुख,सहसचिव मा. श्री. दिलीपशेठ गुगळे, खजिनदार मा.श्री. राजेशजी मोरे, संचालक मा.श्री. अशोकशेठ शिंगवी. मा.श्री. सैफुल्ला खान , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल.डोंगरे,कला विभागाचे प्रमुख प्रा.फलके महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता सुधारणा कक्षचे समन्वयक प्रा गाडेकर तसेच उपप्राचार्य प्रा डॉ नरके यांनी या खेळाडूचे तसेच मार्गदर्शक डॉ. अण्णा मोहिते यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले
.Maratha Reservation | मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ; जामखेड येथे रास्ता रोको आंदोलन
याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डोंगरे एम.एल. म्हणाले की आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कठोर मेहनत घेतात आणि अतिशय मनापासून सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतात. त्यांच्या या प्रयत्नाला महाविद्यालयाचा Athletics अँथलेटिक्स क्रीडा विभाग व त्यांचे मार्गदर्शक डॉ. मोहिते नेहमीच मदत करत असतात त्यामुळे या खेळाडूच्या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना अभिमान वाटतो. University of Calicut kerala येथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय स्तरावर स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ. डोंगरे एम एल यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या
