नगर – नगर शहर हे खेडे गाव ही संकल्पना आज विकास कामांमुळे इतिहास जमा होत आहे. शहर विकासासाठी राज्य शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवित शहरातील रस्त्यांबरोबरच बाह्यवळण रस्ते, प्रत्येक प्रभागतील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण, डांबरीकरण करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध केला आहे. त्याचबरोबर कामांच्या माध्यमातून नगरचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जे-जे शक्य आहे ते केले जात आहे. जागरुक नागरिक आणि कर्तव्यदक्ष नगरसेवकांमुळे प्रभागातील विकास कामांना गती मिळाली, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
नगरसेवक सुनिल त्र्यंबके, पाउलबुधे यांच्या प्रयत्नातून गुलाबनगरला रस्ते कामाचा शुभारंभ
नगरसेवक सुनिल त्र्यंबके व विनित पाउलबुधे यांच्या प्रयत्नांमुळे आणि माजी नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार यांच्या सहकार्याने आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून प्रभाग क्र. 2 मधील गुलाबनगर येथील रस्ते कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी सभागृहनेते विनित पाउलबुधे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, निखिल वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब लांडगे, सतीश कणगे, रोहिदास पुंड, मधुकर लांडगे, गोरख शिंदे, बळीराम चौरे, बाबासाहेब कराळे, राहुल शेंडे, राहुल देसर्डा, भास्कर लहामगे, बाळासाहेब किलबिले, नंदू आजबे, बाबासाहेब तुपे, मन्सीराम पुंड, पोपट कुलट, भानुदास देशमुख, अनिल नगरकर, रमेश आल्हाट, बाबासाहेब केदार, सौ.मोहिनी लोळगे, पुष्पलता वीरकर, विमल बोराटे, डॉ.आघाव, तांदळे सर, पेंडभाजे सर, सचिन सानप, हर्षल विधाते, सचिन लोटके, मार्शल भिंगारदिवे, भास्कर खेडकर आदिंसह नागरिक उपस्थित होते.

पुढे आ.जगताप म्हणाले, प्रभाग दोन मधील चारही नगरसेवकांची ओळख कार्यसम्राट म्हणून झाली आहे. प्रभागातील कामे करतांना पाठपुरावा करुन ती पुर्ण होईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. आपल्या कामातून त्यांनी प्रभागाची चांगली ओळख निर्माण केली आहे.
नगरसेवक सुनिल त्र्यंबके म्हणाले, गुलाबनगरमधील रस्ते डांबरीकरणाचा शुभारंभ आज होत आहे, याचा आनंद आहे. आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी दिलेला निधीमुळे हे काम मार्गी लागले आहे. आ.संग्राम जगताप यांचे या प्रभागावर विशेष प्रेम असल्याने विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देत नाहीत. यासाठी नगरसेवक विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांच्या सहकार्याने प्रभागात चांगली विकास कामे मार्गी लागत आहेत. प्रभागातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट असे सर्वच प्रश्न मार्गी लागत आहेत. प्रभागातील विकास कामांबरोबरच धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या कायम संपर्कात असतो, असे श्री.त्र्यंबके यांनी सांगितले.
Table of Contents
यावेळी नगरसेवक विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, प्रभागात विकास कामे करताना नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभते. त्यांच्या या योगदानामुळे आम्हाला कामे करण्यास उत्साह वाएत्ततो. खा.डॉ.सुजय विखे, आ.संग्राम जगताप यांच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर प्रभागात कामे सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
रस्त्याचा मुख्य प्रश्न चारही नगरसेवक व आ.संग्राम जगताप यांच्या निधीतून मार्गी लागल्याबद्दल गुलाबनगर नागरिकांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
