शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख )
दि. ०३/०१/२०२३.
माहुर निवासिनी श्री रेणुका मातेचे साक्षात असे रूप असलेली आणी नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावुन येणारी अशी ख्याती असलेल्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळीचे ग्रामदैवत व परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि आराध्य दैवत असलेल्या श्री बालंबिका देवीचा यात्रोउस्सव
कर्करोगाशी झुंज अपयशी, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
दि. ६ जानेवारी २०२३ रोजी शुक्रवार पासून प्रारंभ होत आहे. शांकभरी पोर्णिमेला प्रारंभ होणारा हा यात्रोउस्सव तीन दिवस चालणार आहे. दोन दिवस कुस्त्यांचा जंगी हंगामा होईल. अशी माहीती देवी मंदिर ट्रस्ट व यात्रा उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे. शेकडो वर्षापासुन भरणारी ही यात्रा शेवगाव तालुक्यात प्रसिद्ध असून शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२३ शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या या यात्रेत तिन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ०६ जानेवारी रोजी सकाळी कावडीतुन आणलेल्या पाण्याने देवीला अभिषेक घालण्यात येणार आहे, सायंकाळी सहा वासता दीपमाळ पाजळणे, बारागाड्या ओढ़ने, रात्री पालखी मिरवणूक निघेल. दि.

०७ जानेवारी रोजी दुपारी कुस्त्यांचा जंगी हंगामा व रात्री शिवकन्या बडे नगरकर यांचा मराठी लावण्यांच्या तसेच विविध रंगी मनोरंजनात्मक लोकनाट्य तमाशाची प्रेक्षकांना मेजवानी मिळणार आहे. व दि. ८ जानेवारीला दुपारी कुस्त्यांचा जंगी हंगामा तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होईल. तसेच कुस्त्यांच्या जंगी हंगाम्याला जिल्ह्यातील नामवंत मल्ल हजेरी लावतात.
बीड व नगर जिल्ह्याच्या सरहद्दिवर असलेल्या या बालमटाकळी गावात देवीचे भव्य-दिव्य असे शोभनीय मंदिराची वास्तु दिमाखात भविकांचे लक्ष्य वेधुन घेत आहे. श्री बालंबिका देवीचे महत्व पाहता देवीची महती ही सर्वदुर पसरलेली आहे. नवसाला ती पावते म्हणून देवी दर्शनासाठी भाविकांची मोठी अलोट गर्दी होत असते. जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या या यात्रेसाठी प्रत्येक वर्षी अनेक ठिकानाहुन भाविक भक्त येऊन आपला नवस फेडतात, यात्रेच्या सर्व कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन यात्रा समिती व बालंबिका देवी ट्रस्टच्या करण्यात करण्यात आले आहे.
