जामखेड प्रतिनिधी
पल्स पोलिओ मोहीम देशभर राबविण्यात आली असून आपल्या भागातील कोणतेही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून ही मोहिम १०० टक्के यशस्वी करण्यात यावी.असे यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे म्हणाले.
pm muft bijli yojana| मोदी सरकारचा मोठा निर्णय; मिळणार मोफत वीज, यांना मिळणार याचा लाभ
Kharda |खर्डा येथे पल्स पोलिओ लसीकरण
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार मार्फत पल्स पोलिओ Pulse Polio लसीकरण मोहीम आज ३ मार्च२०२४ रोजी घेण्यात आली. यावेळी जामखेड तालुक्यातील खर्डा Kharda येथे पल्स पोलीओवर मात करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. तेव्हा खर्डा Kharda बसस्थानक येथे उपस्थित राहुन लसीकरण करण्यात आले.

या प्रसंगी भाजपा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस Pulse Polio देण्यात आले.यावेळी बाजार समिती चे संचालक वैजिनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश दिंडोरे, युवा नेते नामदेव गोपाळघरे आदी आरोग्य सेविका, मदतनीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
