नगर Nagar जिल्ह्यात एक खळबळ जनक अशी घटना समोर आलेली असून नगरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील हा प्रकार आहे. चारित्र्याच्या संशयातून पत्नी आणि दोन लहान मुलींना जिवंत जाळून एक व्यक्ती झाडाखाली आराम करत होता तर त्यावेळी त्याची पत्नी आणि दोन्ही मुली जिवंत जळत होत्या.
Nagar| नगर जिल्ह्यात खळबळ जनक घटना

उपलब्ध माहितीनुसार , सुनील लांडगे असे आरोपीचे नाव असून पिंपळगाव लांडगा इथे ही घटना घडलेली असून यात तिघींचाही मृत्यू झाला आहे तर सर्व घर संपूर्णपणे जळून गेलेले आहे. आरोपीने हे कृत्य केले त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. पत्नीसोबत चारित्र्याच्या संशयांतून त्याने याआधी देखील अनेकदा भांडणे केलेली होती. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास त्याने त्याची पत्नी लिलाबाई आणि दोन अल्पवयीन मुली यांना अंगावर रॉकेल टाकून पेटवले आणि खोलीला बाहेरून कडी लावून निघून गेला.
Table of Contents
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी त्यानंतर एका झाडाखाली बसलेला होता आणि माझी पत्नी माझ्या पाया पडत होती पण मी तिची ऐकून घेतले नाही आणि पेटवून दिले असे ग्रामस्थांना सांगत होता. दारूच्या नशेत असल्याकारणाने सुरुवातीला तो खरे बोलतोय यावर देखील शंका आली मात्र त्यानंतर ग्रामस्थांनी वेळ न दवडता त्याच्या घराकडे धाव घेतली त्यावेळी तिघींचाही मृत्यू झालेला होता. आरोपीस नगर Nagar तालुका पोलिसांनी अटक केलेली आहे.
