Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » BJP| भाजप विरोधात शिंदे गटात धुसफूस वाढली; भाजपचा सर्व्हेच्या नावाखाली जागांवर डल्ला?

BJP| भाजप विरोधात शिंदे गटात धुसफूस वाढली; भाजपचा सर्व्हेच्या नावाखाली जागांवर डल्ला?

mahalokwaniBy mahalokwaniMarch 28, 2024Updated:March 28, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

लोकांच्या भावना वेगळ्या आहेत. सर्व्हेचा बाऊ करण्यापेक्षा आपला उमेदवार कसा आहे. जनमत कसे आहे, ते आपण मनाने ठरवलं पाहिजे. त्यात उन्नीसबीस असेल तर पिकअप केलं पाहिजे. तुमचा सर्व्हे निगेटीव्ह आला तर पॉझिटिव्ह कुणाचा आला? हा पण सवाल आहे. त्यामुळे सर्व्हेमध्ये जाऊ नका. उमेदवार चांगला असेल तर त्याच्यापाठी राहा, असं आवाहन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे.

Table of Contents

BJP भाजप कोण ?

old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..

राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपने BJP कंबर कसली आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांसोबत जागा वाटपही सुरू केलं आहे. हे जागा वाटप सुरू असतानाच निगेटिव्ह सर्व्हेच्या नावाखाली भाजपने शिंदे गटाच्या जागा बळकावण्याचं सत्र सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटात भाजपविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे. ज्या कारणांमुळे उद्धव ठाकरेंची साथ सोडली, त्याच्या उलट कृती महायुतीत व्हायला लागली आहे. आमचे मतदारसंघ धोक्यात आले आहेत, अशी भावना शिंदे गटाच्या खासदारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील BJP अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप BJP शिंदे गटाकडून त्यांच्याकडे असलेल्या जागा घेण्यास सुरुवात केली आहे. मतदारसंघाचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. सर्वे निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे मतदारसंघ हातचा जाऊ शकतो, असं कारण देत भाजप या जागा बळकावत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या नेत्यांकडून होत आहे. त्यामुळे नेत्यांचं खच्चीकरण होत असल्याचंही या नेत्यांच म्हणणं आहे. शिंदे गटाच्या या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तशी नाराजी व्यक्त केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.


अमरावतीची जागा शिवसेनेकडे होती. आनंदराव अडसूळ हे शिवसेनेतून पाचव्यांदा निवडून आले होते. गेल्यावेळी नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला. नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या. मात्र, पक्षातील फुटीनंतर भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून घेतली आहे. नवनीत राणा भाजपमध्ये येणार असल्याचं सांगून ही जागा भाजपने BJP स्वत:कडे घेतली आहे. त्यामुळे अडसूळ प्रचंड संतापले आहेत. नाशिक ही शिवसेनेची पारंपारिक जागा आहे. हेमंत गोडसे हे शिवसेनेचे खासदार आहे. मात्र, त्यांची जागाही धोक्यात आली आहे. त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे. ही जागा भाजप आणि राष्ट्रवादीलाही हवी आहे. त्यामुळे गोडसे यांची सीट धोक्यात आली आहे.

BJP भाजप कोण ?

आमच्या पक्षाचा निर्णय घेणारं भाजप कोण? भाजप त्यांच्या पक्षाचा निर्णय घेत आहे. आमच्या पक्षाचा निर्णय घेत नाही. एकनाथ शिंदे आमच्या पक्षाचा निर्णय घेत आहे. शिंदेंनी घेतलेला निर्णय आम्हाला बंधनकारक आहे. भाजप ढवळाढवळ करतात यात तथ्य नाही. आम्ही आमच्या लोकांचा निर्णय घेणार. भाजपचा निर्णय जसा आम्ही घेऊ शकत नाही, तसे ते आमचा निर्णय घेऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.

काही कारणं असतील

भाजपच्या BJP लोकांचे तिकीट कापलं जात आहे. त्याला काही कारणं असतील. एखाद्या उमेदवाराला तिकीट दिलं म्हणजे त्याच्या अंतापर्यंत तोच उमेदवार राहील असं नाही. कालचक्र ही फिरत असतं. फिरत राहील. शिवतारे प्रकरण संपलं. अशा अनेक प्रकरणाचे निकाल कालच्या बैठकीत लागले आहेत. आज एक यादी जाहीर होईल. नंतर दुसरी यादी जाहीर होईल. आता चर्चा थांबल्या आहेत. उमदेवारी जाहीर होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleWater| जामखेडवर जलसंकट; तहसील कार्यालयावर महिलांचा आक्रोश करत हंडा मोर्चा
Next Article Nilesh lanke| आमदार निलेश लंके शरद पवारांना दिलेला शब्द पाळणार.. ?
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.