Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| जामखेडच्या राजकरणात सर्वात मोठा बदल; दोन प्राध्यापक एकत्र येणार..!

Jamkhed| जामखेडच्या राजकरणात सर्वात मोठा बदल; दोन प्राध्यापक एकत्र येणार..!

mahalokwaniBy mahalokwaniAugust 27, 2024Updated:August 27, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत जामखेड Jamkhed विधानसभा प्रमुख तथा जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी रोहित पवारांच्या हुकुमशाही कार्यपध्दतीला कंटाळून पक्षाचा राजानामा देण्याची घोषणा केली होती.

Jamkhed| जामखेडच्या राजकरणात सर्वात मोठा बदल

राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर राळेभात हे कुठल्या पक्षात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचलेली असतानाच राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी भाजपात यावे असे खुले निमंत्रण दिले आहे.

जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी दोन दिवसापुर्वी पत्रकार परिषद घेवुन राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. पक्षातून बाहेर पडताना प्रा राळेभात यांनी आ रोहित पवारांच्या हुकूमशाही कार्यपध्दतीवर सडकुन टिका केली होती.

Table of Contents

  • Jamkhed| जामखेडच्या राजकरणात सर्वात मोठा बदल

प्रा मधुकर राळेभात हे जामखेड तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचे नेते आहेत. त्यांच्याकडे मोठा जनाधार आहे. सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय असलेल्या प्रा मधुकर राळेभात यांच्यासारख्या जेष्ठ नेता आपल्या पक्षात असावा अशी सर्वच राजकीय पक्षांची पसंती असते. प्रा राळेभात यांनी भाजपात यावे यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी कंबर कसली आहे. शिंदे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीत राळेभात यांनी भाजपात यावे असे खुले निमंत्रण दिले आहे. जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांच्यासारखा महत्वाच्या नेत्याला भाजपात घेण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

प्रा मधुकर राळेभात यांचा सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील अनूभव खूप मोठा आहे. ते कायम सामाजिक कार्यात सक्रिय असतात. प्रा मधुकर राळेभात यांनी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले. त्याचबरोबर त्यांनी २००९ ची विधानसभा निवडणूक लढवत जामखेड तालुक्यात क्रमांक १ ची मते मिळवली होती. जामखेड तालुक्याच्या राजकारणातील जेष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

कर्जत जामखेडच्या विकासासाठी आणि स्वाभिमानासाठी प्रा मधुकर (आबा) राळेभात हे भारतीय जनता पार्टीत आल्यास त्यांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल, अशी उघड भूमिका आमदार प्रा राम शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मांडली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleचला जामखेड वाचवूया प्रारूप विकास आराखडा रद्द करा; उद्या जामखेड बंद- प्रा.मधुकर राळेभात
Next Article Jamkhed|जामखेडच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पुन्हा धक्का; शिक्षक भरती विरोधात याचिका दाखल.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.