Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed|जामखेडच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पुन्हा धक्का; शिक्षक भरती विरोधात याचिका दाखल.!

Jamkhed|जामखेडच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पुन्हा धक्का; शिक्षक भरती विरोधात याचिका दाखल.!

mahalokwaniBy mahalokwaniAugust 31, 2024Updated:August 31, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड: जामखेड  च्या वादग्रस्त पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पोर्टल मार्फत होत असलेल्या शिक्षक भरतीला औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे .

Jamkhed|जामखेडच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पुन्हा धक्का

या संस्थेचे विश्वस्त मंडळ बोगस असून 2001 पासून या संस्थेची विश्वस्त मंडळाची निवडणूक झाली नाही . तेव्हापासून  सर्व बदल अर्ज धर्मदाय उप आयुक्त अहमदनगर यांनी रद्द केलेले आहेत . त्या बद्दल एक दावा धर्मदाय आयुक्त पुणे व दोन दावे धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांच्या समोर प्रलंबित आहेत .

या संस्थेच्या जामखेड महाविद्यालय जामखेड च्या प्राध्यापक भरतीला सुद्धा शिक्षण संचालक उच्च शिक्षण विभाग व सह संचालक उच्च शिक्षण विभाग यांनी संस्थेला संचालक मंडळ नसल्या कारणाने परवानगी नाकारून ती भरती रद्द केली होती. त्या संदर्भात संस्थेचे माजी सचिव दिलीप बाफना व संस्था सदस्य बाळासाहेब पवार यांनी तक्रार केली होती

ही पोर्टल मार्फत काही बोगस लोक संस्थेचे पदाधिकारी म्हणून कारभार पाहत आहेत . या नोकर भरतीत उमेदवारांची आर्थिक फसवणूक होऊ नये व त्यांची इतर ठिकाणची संधी जाऊ नये म्हणून औरंगाबाद उच्च न्यायालयात या पवित्र पोर्टल शिक्षक भरती  ला बाळासाहेब पवार यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे . व  ही नोकरभरती रद्द करावी अशी मागणी केली आहे .

या संस्थेचे विश्वस्त मंडळ बोगस असून नोकर भरती चां त्यांना अधिकार नाही असे निवेदन शिक्षण संचालक पुणे व माध्यमिक शिक्षण अधिकारी अहमदनगर यांना  ही भरती प्रक्रिया सुरू झाली तेव्हाच दिले होते परंतु  पवित्र पोर्टल प्रणाली त या संस्थेचे नाव नव्हते परंतु अचानक या संस्थे ने उमेदवारांना मुलाखती साठी  मेल केले आहेत . यांना मुलाखती किंवा नियुक्ती करण्याचा अधिकारच नाही .

अश्याच पद्धतीने जामखेड Jamkhed महाविद्यालयात प्राचार्य पद भरण्यात आले त्यांची याचिका लवकरच दाखल केली जाईल . नोकरी साठी येनाराला ही माहिती नसल्या मुळे त्याची फसवणूक होते त्यामुळे नोकरभरती करू नये म्हणून ही याचिका दाखल केली असल्याचे याचिकेत म्हंटले आहे  या विश्वस्तांनी केलेल्या नियुक्त्या कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकतात .

Table of Contents

  • Jamkhed|जामखेडच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पुन्हा धक्का

संस्थेचे अध्यक्ष हे कायदेशीर अध्यक्ष नाहीत . संस्थेचे सचिव तर संस्थेचे सदस्य पण नाहीत . त्यांना शिक्षक नियुक्ती आदेश किंवा पुढील शिक्षक मान्यता प्रस्ताव करण्याचा अधिकार नाही तसे केल्यास त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल .

या संस्थे चे अनेक गैरव्यवहार ची चौकशी करण्याची मागणी ही याचिकेत करण्यात आली आहे . नुकतेच एका कुटुंबाने नोकरभरती त या संस्थेने चुकीच्या पद्धतीने भरती केलेल्या उमेदवाराची नियुक्ती रद्द करावी म्हणून जिल्हा परिषद अहमदनगर येथे उपोषण केले होते .  

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed| जामखेडच्या राजकरणात सर्वात मोठा बदल; दोन प्राध्यापक एकत्र येणार..!
Next Article iphone 16 Prize | iphone 16 बद्दलची उत्सुकता संपली; खूप कमी किमतीमध्ये मिळतोय iphone 16
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.