पारनेर : प्रतिनिधी
Parner पारनेर-नगर मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार खासदार नीलेश लंके हे ठरविणार आहेत. लंके यांनी नाव घ्यावे मी लगेच एबी फॉर्मवर सही करतो असे सांगत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मतदारसंघाच्या उमेदवार राणीताई लंके याच असतील असे अप्रत्यक्षपणे जाहिर केले.
iphone 16 Prize | iphone 16 बद्दलची उत्सुकता संपली; खूप कमी किमतीमध्ये मिळतोय iphone 16
Parner | पारनेर राष्ट्रवादीच्या उमेदवार राणीताई लंकेच; जयंत पाटील यांची अप्रत्यक्ष घोषणा!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी सायंकाळी निघोजमध्ये पोहोचल्यानंतर मळगंगा मंदिरासमोर झालेल्या सभेमध्ये पाटील बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, महेबूब शेख, मा. आ. राहुल जगताप, स्वप्निल गायकवाड, अतुल लोखंडे, राणीताई लंके, अर्जुन भालेकर, अॅड. राहुल झावरे, बाबाजी तरटे, सुवर्णा धाडगे, लकी कळमकर,डॉ. बाळासाहेब कावरे, सतिष गव्हाणे, वसंत कवाद, ठकाराम लंके, सोमनाथ वरखडे, शिवाजीराव लंके यांच्यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, पारनेर Parner मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची ते आम्ही खासदार साहेबांवर सोडले आहे. तुम्ही सर्वानुमते ठरवा कोणाला उमेदवारी द्यायची. खा. लंके यांनी नाव घ्यावे. नुसते नाव नव्हे तर ते उखाण्यात घ्यावे. शरद पवारांपुढे त्यांनी उखाण्यात नाव घेतल्यावर मी त्यांच्या एबी फॉर्मवर लगेच सही करेल असे सांगत विधानसभेच्या उमेदवार खा. लंके यांच्या पत्नी राणीताई लंके याच असतील असे त्यांनी अप्रत्यक्ष सांगितले.
यावेळी पुढे बोलताना पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या वतीने शिर्डी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पाच ते सात कोटी रूपये खर्च करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांना घेऊन जाण्यासाठी एसटी बसेसचा वापर करण्यात आल्याने शिक्षणासाठी एसटीने प्रवास करणारे विद्यार्थी रस्त्यावर ताटाकळत उभे असल्याचे जिल्हाभर पहावयास मिळाले. सरकारच्या सत्तेच्या गैरवापराला पारावार राहीला नसून सरकार आपल्या दारी या कार्यक्रमासाठी महिना,महिनाभर दाखले रखडविण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला. आतापर्यंंत कधीही झाला नाही इतका खर्च या सरकारने जाहिरातींवर केल्याचेही पाटील यांनी सांगितले.
Table of Contents
खा. लंके यांचे कौतुक का ?
खासदार नीलेश लंके यांचे कौतुक का ? तर आमच्याकडे कोणी येण्यास तयार नव्हते त्यावेळी ते आमच्या पक्षात आले. त्यांनी कोणत्या ज्योतिषाकडे पाहिले हे माहीती नाही परंतू त्यांनी सुरूवात केली आणि राज्यभरातून पक्षात इन्कमींग सुरू झाले. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या ४८ पैकी ३१ जागा विजयी झाल्याचे पाटील म्हणाले.
आम्हाला फ्री हॅण्ड द्यावा लागेल
लोकसभा निवडणूकीत दुसऱ्याचं इंजेक्शन लागू पडले नसते, त्यामुळे मी निवडणूकीच्या रिंगणात उतरलो. महाविकास आघाडीच्या काळात आम्हाला फार त्रास झाला आहे. आता आपले सरकार सत्तेवर येणार असून त्यावेळी आम्हाला फ्री हॅण्ड द्यावा लागेल. निवडणूकीच्या काळात माझा अपघात घडवून आणण्याचाही प्रयत्न झाला. माझ्यात हिंमत होती म्हणून या निवडणूकीत मी यश मिळवू शकलो.
एक लाखांच्या फरकाने मविआचा उमेदवार विजयी होईल
याच जनतेने मला सरपंच ते खासदार बनविले. सन २०१९ मध्ये याच निघोजमध्ये जनसंवाद यात्रेची सभा झाली. यंदाही निघोजमध्ये होत आहे. सन २०१९ मध्ये राज्यात परिवर्तन झाले. आता विधानसभेबरोबरच लोकसभेतही परिवर्तन होईल. कारण माता मळगंगेचा आशिर्वाद असल्यावर अपयश येण्याचे कारण नाही. ज्याची पहिली सभा होईल त्याला अडचण येत नाही. विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवार एक लाखांच्या मताधिक्क्याने विजयी होईल. नीलेश लंके खासदार
