Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home »  Sudha Kankaria | गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा; मुलगी असेल तरच भविष्य उज्वल आहे – डॉ. सुधा कांकरिया

 Sudha Kankaria | गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा; मुलगी असेल तरच भविष्य उज्वल आहे – डॉ. सुधा कांकरिया

mahalokwaniBy mahalokwaniOctober 1, 2024Updated:October 1, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

45 गोडूलींचे व मातांचे भावस्पर्शी स्वागत-सन्मान

अ.नगर – येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील 45 नवजात मुली-गोडूलीचे स्वागत सन्मान झबल टोपड देऊन तर त्यांच्या मातांचा सन्मान पौष्टीक खारीक खोबर्‍याचे पॅकेट तसेच सन्मानपत्र देऊन करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा या अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटल मधील 45 नवजात लेकींचा व आईचा अत्यंत भावस्पर्शी स्वागत-सन्मान करण्यात आला. अशी माहिती या प्रोजेक्टच्या चेअरमन व स्त्रीजन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया Sudha Kankaria यांनी दिली.

Parner | पारनेर राष्ट्रवादीच्या उमेदवार राणीताई लंकेच; जयंत पाटील यांची अप्रत्यक्ष घोषणा!

 Sudha Kankaria | गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा; मुलगी असेल तरच भविष्य उज्वल आहे – डॉ. सुधा कांकरिया

आतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. गुरावले हे अध्यक्षस्थानी होते तर डॉ. निर्मला पालेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर प्रसंगी सौ. अनघा राऊत, सौ. साधना देशमुख, सौ. प्रिती सोनवणे, सौ. नेहा जाधव, सचीव श्री सुभाष गर्जे, माधव देशमुख, रविंद्र राऊत, हर्षवर्धन सोनवणे, सुहास क्षिरसागर, आदिनाथ ठोंबे, मेट्रन ज्योती लोंढे तसेच कविता चव्हाण उपस्थित होते.
अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. गुरावले यांनी सदर प्रोजेक्टचे कौतुक करून रोटरी क्लबचे अभिनंदन केले. आपला आदर्श समोर ठेऊन इतर संस्थानेही पुढे यावे असे ते म्हणाले.

Table of Contents

  •  Sudha Kankaria | गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा; मुलगी असेल तरच भविष्य उज्वल आहे – डॉ. सुधा कांकरिया


सदर प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. सौ. निर्मला पालेकर म्हणाल्या की आम्ही गेल्या 12 वर्षा पेक्षा जास्त काळापासुन डॉ. सुधाताईंचे हे कार्य पहात आहोत. आज त्यांच्या समवेत सदर कार्यक्रमात सहभागी होतांना आम्हाला आनंद होत आहे. आपला अनुभव सांगतांना त्या म्हणाल्या की नवजात मुलींची प्रतिकार शक्ती मुलांपेक्षा अधिक असते. कितीही मोठे आजारपण आले तरी त्या त्यातुन तरून जातात. जन्माआधीच मुलींना मारून टाकणं हे महापाप आहे.


सदर प्रसंगी दुसर्‍यांदा नात झालेल्या आजीनेही आपले मनोगत व्यक्त केले म्हणाल्या की लेकीचं जीव लावतात. शेवट पर्यंत त्यांच्याच प्रेमाचा आधार असतो. हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे. त्यामुळे मला दुसरी नात झाली याचा विशेष आनंद आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे सचीव श्री सुभाष गर्जे यांनी केले. सदर प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना डॉ. सुधा कांकरिया Sudha Kankaria म्हणाल्या की मुलगी जगली वाचली तरच जग तरणार आहे. मुलगी आहे म्हणूनच आपले भविष्य उज्वल होणार आहे. आज आपण नवरात्री निमित्त स्त्रीशक्तीचा जागर करतो, धनासाठी लक्ष्मीची पुजा करतो, ज्ञानासाठी सरस्वतीची भक्ती करतो तर अन्यायाविरूध्द लढण्यासाठी दुर्गा माते कडून बळ घेतो.

असे असले तरी आजची शोकांकिका आहे की आजची गोडूली गर्भात किंवा समाजात कुठेच सुरक्षित नाही. प्रत्येक घरोघरी स्त्रीजन्माचे स्वागत झाले तरच सामाजिक संतुलन निर्माण होणार आहे. अनघा राऊत आभार मानतांना म्हणाल्या की राखी पौर्णिमेच्या दिवशी ओवाळणीद्वारे प्राप्त झालेल्या रकमेतुन सदर सन्मान करण्यात आला याचा आम्हा सर्व रोटेरीयन भगिनींना विशेष आनंद होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleParner | पारनेर राष्ट्रवादीच्या उमेदवार राणीताई लंकेच; जयंत पाटील यांची अप्रत्यक्ष घोषणा!
Next Article Motor मोटारसायकल चालवण्याच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या वयोमर्यादा
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.