आचारसंहीता लागू झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. पण याला अपवाद हे शेवगाव – पाथर्डी मतदार संघात दिसून येत आहे, कारण बऱ्याच ठिकाणच्या मतदार संघात आचारसंहिता लागल्यानंतर राजकीय मंडळींच्या हालचालींना वेग येत असतो.
Pratap Dhakne | उमेदवारी फिक्स; मविआचा शेवगाव – पाथर्डी मतदारसंघाचा चेहरा प्रताप काका ढाकणे !
शेवगाव – पाथर्डी मतदार संघातील मा. प्रताप काका ढाकणे यांनी माघील ३ वर्षांपासून आपल्या मतदार संघ पिजून काढलेला आहे, ते शेवगाव – पाथर्डी मधील सामन्यातील सामान्य माणसापर्यंत पोहचलेले आहेत. त्यांच्या सुख;दुःखात सामील झालेले आहेत, हे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रताप काका Pratap Dhakne यांना मानणारा वर्ग आता वाढलेला पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा : Ladki Bahin Hapta| लाडकी बहीणीसाठी मोठी बातमी; पैसे कधी येणार फॉर्म भरणे चालू कि बंद..
Table of Contents
प्रताप काका ढाकणे यांनी शेतकऱ्यांसाठी , युवा वर्गासाठी, वयोवृद्धसाठी , तसेच माता बहिणीसाठी व इतर अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत, माघील काही दिवसामध्ये त्यांनी युवकांसाठी भव्य असा रोजगार मेळावा घेतला, त्यामध्ये शेवगाव – पाथर्डी मतदार संघातील हजारो युवकांना रोजगार मिळाला आहे, त्यांनी अध्यात्म क्षेत्रात पण आपला वारसा जपला आहे, अनेक धार्मिक कार्यक्रम घेऊन त्यांनी लोकांना संघटित केल्याचे पाहायला मिळत आहे.

ज्यावेळेस खासदारकी लागली होती त्या वेळस पण प्रताप काका यांनी खासदार निलेश लंके यांना शेवगाव – पाथर्डी मतदार संघातून मोठ्या प्रमाणात लीड मिळवून दिली होती, आणि खासदार लंके यांना मानणारा वर्ग पण खूप मोठ्या प्रमाणात आहे, याचाच फायदा प्रताप काका ढाकणे यांना होणार आहे , यात तीळ मात्र शंका नाही. सध्याचे महाराष्ट्रातले वातावरण हे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, आणि प्रताप काका ढाकणे हे शरद पवार तसेच खासदार निलेश लंके यांचे निकटवर्तिय मानले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अनेक अंतर्गत सर्वे केले आहेत, त्यामध्ये शेवगाव- पाथर्डी मध्ये प्रताप काका ढाकणे Pratap Dhakne हे आघाडीवर आहेत, आणि महाविकासआघाडी कडून प्रताप काका ढाकणे यांची उमेदवारी फायनल मानले जात आहेत.
