Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Dnyanradha Multistate |ज्ञानराधा संस्थेचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांच्यावर जामखेडमध्ये गुन्हा दाखल; नागरगोजे यांच्या उपोषणाला यश

Dnyanradha Multistate |ज्ञानराधा संस्थेचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांच्यावर जामखेडमध्ये गुन्हा दाखल; नागरगोजे यांच्या उपोषणाला यश

mahalokwaniBy mahalokwaniAugust 8, 2024Updated:August 8, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

ज्ञानराधा मल्टीस्टेट Dnyanradha Multistate संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ यांच्या सर्व मालमत्ता जप्त करून तात्काळ ठेवीदारांच्या ठेवी परत द्याव्यात. भ्रष्ट आमदार, खासदार, मोठे अधिकारी यांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करावी. शेतकऱ्यांना कृषी पंप द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी अॅड. महारुद्र नागरगोजे यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.’नाही जातीसाठी… लढा मातीसाठी… गरिबांच्या हक्कासाठी’, असे घोषवाक्य घेऊन अॅड. महारुद्र नागरगोजे यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर सोमवारी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते.

त्यांनी प्रभारी तहसीलदार मनोज भोसेकर यांना निवेदन दिले होते.
जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते ॲड.महारूद्र नागरगोजे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Dnyanradha Multistate |ज्ञानराधा संस्थेचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांच्यावर जामखेडमध्ये गुन्हा दाखल


या आंदोलनाची‌ दखल घेत आज रोजी अॅड. महारुद्र नागरगोजे यांनी गोर-गरीब जनतेसाठी सुरु केलेले आंदोलनाला यश आले असून जामखेड चे तहसीलदार गणेश माळी यांच्या लेखी आश्वासनंतर तहसीलदार गणेश माळी,जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व उपस्थित ठेविदार ,गोरे – गरीब नागरिकांच्या हस्ते पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.


ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे , संचालक मंडळ व शाखाधिकारी यांच्यावर एम पी आय डी ३ व ४ प्रमाणे व जूने भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती हभप ॲड.महारुद्र नागरगोजे यांनी दिली.
यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात,जेष्ठ नेते सुरेश भोसले,शहाजी राळेभात,वैजिनाथ पोले, संजय काशिद, महेश निमोणकर,माजी सरपंच गफ्फारभाई पठाण, समीरभाई पठाण, बापूसाहेब कार्ले,ॲड. हर्षल डोके, संदीप राळेभात,अनिल बाबर,संतोष गव्हाळे, अभिजीत राळेभात,लक्ष्मी पवार,संतोष पिंपळे, सदाशिव ढवण, लक्ष्मण बांगर, दिगंबर राळेभात, ॲड.महेश वारे, ॲड.अजिनाथ जायभाय, युवराज शेलार, कांतीलाल आढाव तसेच वकील संघटना आदींनी पाठिंबा दर्शविला होता.


या उपोषण प्रसंगी प्रवीण राळेभात, शिवलिंग राउत,अरुण चव्हाण,उत्तम सावंत,मोहन चव्हाण ,दया चव्हाण,नारायण सावंत, डॉ. प्रदीप कात्रजकर, सुतार सर, ॲड.प्रमोद राऊत, मधुकर पवार,दादाहरी शिंदे,महेश भोसले, दहीकर सर ,अशा बऱ्याच ठेविदारांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
उपोषणामध्ये गोरगरिबांचे मुद्दे असल्यामुळे खेडेगावातून सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांनी येऊन पाठिंबा दिला आहे.

Dnyanradha Multistate मल्टीस्टेट संस्थेच्या पदाधिकारी व संचालकांच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना ठेवी मिळाव्यात, आदी विविध मागण्या त्यांनी केल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAhmednagar|अहमदनगर हादरलं; मुलीचे हात पाय व तोंड बांधून…, शाळेच्या गच्चीवर घडला धक्कादायक प्रकार
Next Article Suraj Chavan | बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणने केले असे कृत्य; सर्वत्र त्याचीच चर्चा
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.