निघोज येथे आ. निलेश लंके यांचा वाढदिवस साजरा निघोज : विशेष प्रतिनिधी कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे भाजपावाले भाव पडल्यावर कांद्याकडे ढुुंकूनही पहायला तयार नसल्याची टीका करीत कांदा, ऊस तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निघोज येथे बोेलताना सांगितले. दरम्यान, तालुक्याच्या हितासाठी काही ना काही केले पाहिजे यासाठी सतत कार्यरत असलेल्या आ. नीलेश लंके यांनी सतत सामान्य माणसाच्या हिताची जपवणूक करण्यासाठी प्रयत्न केल्याचे गौरवोद्गारही पवार यांनी यावेळी काढले. आ. नीलेश लंके (Nilesh Lanke) यांचा वाढदिवस, निघोज पतसंस्थेचे बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्था असे नामकरण, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे लोकार्पण,…
Author: mahalokwani
मुंबई : बिग बाॅस 15 मधून खरी ओळख मिळवणारी टिव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बिग बाॅस 15 मधूनच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. तेजस्वी प्रकाश हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी करण हा थेट तेजस्वी हिला गोव्याला घेऊन गेला होता. अनेकदा हे दोघे स्पाॅट होतात. इतकेच नाहीतर नागिन मालिकेच्या सेटवर करण अनेकदा तेजस्वी प्रकाश हिला घेण्यासाठी देखील येतो. ज्याचे काही व्हिडीओ हे यापूर्वी व्हायरल झाले आहेत. करण कुंद्रा याची आई देखील तेजस्वी प्रकाशच्या घरी जाते. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत आहेत की, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप झाले आहे.…
H3N2 Influenza Symptoms: 3 वर्षांनंतर आता कुठे भारतासह संपूर्ण देशाची कोरोनाच्या महामारीपासून सुटका होत होती, मात्र अशातच इन्फ्लूएंजा व्हायरस H3N2 ने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. याची वेळीच काळजी घेतली नाही तर हा साधा त्रास जीवघेणा ठरू शकतो. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR च्या म्हणण्यानुसार, गेल्या 2-3 महिन्यांमध्ये इन्फ्लूएंजा व्हायरसच्या A सबटाइप H3N2 मुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, H3N2 मुळे रूग्णालयात दाखल करणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक, पंजाब आणि हरियाणा या भागांमध्ये H3N2 मुळे मृत्यू…
महालोकवाणी न्यूज: कर्जत / जामखेड | नुकतीच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. काल अर्थसंकल्पीय भाषणामध्ये थोर व्यक्तींच्या जन्मभूमीच्या बाबतीत बोलत असताना अनावधानाने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राहिला होता तो उल्लेख महापुरुषांच्या जन्मभूमीच्या विकासाच्या बाबतीत जेव्हा ते उत्तर देतील त्या उत्तरात ते सकारात्मक राहतील असा विश्वास व्यक्त करत चौंडी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी केली तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात जो निधी देण्यात आलेला आहे त्यावर असलेली स्थगिती देखील उठवण्यात यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड शहरातील महावीर भवन येथे दि.९ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता व्यापारी,टपरीधारक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेते यांची जामखेड 548 D अतिक्रमण संदर्भात बैठक पार पडली या या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी व्यापारी व टपरीधारकांना पाठिंबा दिला व जामखेड शहरातील सर्व टपरीधारक व व्यापाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. या करिता आज रोजी जामखेड तहसिल कार्यालय येथे तहसिलदार योगेश चंद्रे व जामखेड पोलीस स्टेशन चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,जामखेड हे बीड, नगर, सोलापूर व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील शहर आहे त्यामुळे जामखेड शहराची बाजारपेठ अतिशय मोठी व…
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन महालोकवाणी न्यूज: लोकप्रियतेमुळे नेत्याचा लोकनेता कधी झाला हे विरोधकांना न उलगडलेले कोडे आहे. आमदार लंके यांच्या वाढदिवसाला मतदार संघात एक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले असून मतदार संघातील बहुतांश गावांसोबतच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी १० मार्च रोजी नानाविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. अशा या जनमानसांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..! तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आमदार लंके साहेबांची आता भावी खासदार म्हणून बरेच पोस्टर आपणास पाहायला मिळत आहे, आणि त्याची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. दररोज सकाळी उठल्यापासून रात्री दोन पायांना चक्री लाऊन हजारो लोकांना तीन वाजता झोपेपर्यंत लोकांसाठी,लोकांसोबत लोकांत जाऊन भिडणारा आमदार आणि निलेश…
महालोकवाणी न्यूज: सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील श्री वामनभाऊ विद्यालयामध्ये शालेय वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम आज (ता.९) मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य दिलीप गोरे, एकलव्य शिक्षण संस्थेचे समन्वयक एस.पी.तुपे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अहमदनगर जिल्हा परिषद सदस्या प्रभावती प्रतापराव ढाकणे यांनी भूषविले. तसेच या कार्यक्रमाला मा.नगराध्यक्ष रत्नमाला उदमले आरतीताई निर्हाळी,आदिनाथ बडे,,जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक सापते सर,डॉ राजेंद्र खेडकर,गोविंद बडे,नवनाथ सातपुते,मीरा बडे,अश्विनी साळुंके,मीना पालवे,मंगल वायभासे,शिवाजी गीते,त्रिंबक कराड, विद्यार्थी, सर्व शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक, कला, क्रीडा,वक्तृत्व स्पर्धा व शैक्षणिक क्षेत्रातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे वार्षिक बक्षीस वितरण…
पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे खासदार सुप्रियाताई. सुळे यांचा आज गावभेट दौरा पार पडला यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. राज्य सरकार च्या बजेट बाबत विचारले असता त्या म्हणाल्या. मी एक तर राज्याचे बजेट पूर्ण वाचलेले नाही, बातम्या दादांचे स्टेटमेंट पाहिले, एकूण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी भूमिका मांडलेली आहे त्यातील बऱ्याच जुन्या स्कीम लागू करण्यात आलेल्या आहेत.सरकारने ज्या कमिटमेंट्स केलेल्या आहेत तेवढे पैसे सरकारकडे आहेत का हेही पाहिले पाहिजे . राज्यासह दौंड मध्ये गुन्हेगारी वाढली आहे हे राज्य सरकार चे अपयश आहे . दौंड मध्ये.अनेक रेल्वे गाड्या थांबत नाहीत मग रेल्वे नेमकी कोणासाठी आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी माजी…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजु झालेले पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना गुप्त माहीतीदारामार्फत माहीती मिळाली की, जामखेड शहरातुन साकतकडे एक इसम हा देशी विदेशी दारुची विक्री करण्यासाठी बुलेट मो.सा वरुन चोरुन विना परवाना वाहतुक करत आहे, आता गेल्यास सदर इसम हा मुद्देमालासह मिळुन येईल अशी बातमी मिळाल्याने त्यांनी लगेचच पो.स्टे. चे गुन्हे शोध पथक रवाना करुन सदरची गाडी मार्केट यार्ड येथे येताच पथकाने सापळा रचुन सदर आरोपी – विनोद शहाजी इंगळे वय 29 वर्ष राहणार हापटेवाडी तालुका जामखेड त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात एकुण 16,040 /- रु. किमतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या व…
महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड शहरातील लक्ष्मीआई चौक (संविधान स्तंभ) येथे शिवजन्मोत्सव सोहळा माहिला समिती आयोजित शिवजयंती निमित्त मा.संजय (काका) काशिद मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. आज दि.9 मार्च रोजी सकाळी १० वा. प्रसिद्ध उद्योगपती रमेशशेठ गुगळे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले तसेच भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. आजच्या रक्तदान साठी राजेंद्र जाधव (फिटर) व सौ.कूंदा राजेंद्र जाधव या दांम्प्त्याने सर्व प्रथम रक्तदानाला सुरवात केली. यावेळी कार्यक्रमा चे उद्घाटक प्रसिद्ध उद्योगपती रमेश गुगळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्ति व बुध्दी च्या जोरावर स्वराज्य उभे केले…