साताराः जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना महाराष्ट्रात मात्र एका घटनेने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मात्र एका धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला दिनादिवशीच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर ती अत्याचारग्रस्त मुलगी आठ महिने 21 दिवसांची गर्भवती राहिली होती. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्यामुळे याप्रकरणी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करून पीडित अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुलीच्या पोटात गर्भ नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या…
Author: mahalokwani
कर्जत-जामखेडची तब्बल 62.37 कोटींची प्रलंबित मदत महिनाअखेर मिळणार; विधीमंडळात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण महालोकवाणी न्यूज कर्जत / जामखेड | नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर-2022 मध्ये सातत्याने झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये नगर जिल्हयात 800 कोटींहून अधिक नुकसान झाले असून कर्जत व जामखेड तालुक्यातही कोट्यवधींचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे देखील पूर्ण झाले असताना गेल्या पाच महिन्यांपासून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला तर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह इतरही आमदार नगर जिल्ह्यातील कोट्यवधींची ही मदत शेतकऱ्यांना…
आजच्या माहिला व मुलींनी आपला ध्यास ओळखणे गरजेचे – श्रीम.शोभा कांबळे जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवारजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जनविकास सेवाभावी संस्था जामखेड आयोजित वार- बुधवार दि. 8 मार्च रोजी दुपारी 1 वाजता राजमाता जिजाऊ आऊसाहेब , पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर , सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शोभा कांबळे म्हणाल्या, आजच्या माहिला व मुलींनी आपला ध्यास ओळखणे गरजे चे आहे. कर्तृत्व सिध्द करणे तसेच महिलांच्या कर्तृत्वाचा आदर सन्मान करणे म्हणजे च महिला दिन.यावेळी गुलाब जांभळे म्हणाले,खचलेल्या माहिलांना प्रवाहात आणून त्यांना मदत करणे व व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचे आत्मविश्वास वाढवणे काळाची गरज आहे.भारती दिदी…
जामखेड (प्रतिनिधी) :- धनराज पवार महिलांना त्यांच्या हक्क आणि अधिकाराची जाणीव करून दिली पाहिजे, असे प्रतिपादन जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. महेश पाटील यांनी केले.ग्रामीण विकास केंद्र जामखेड संचालित निवारा बालगृह आयोजित महिला दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. समता भूमी, मोहा फाटा, बीड रोड, जामखेड येथील निवारा बालगृहाच्या सभागृहात ह. भ. प. कांताताई सोनटक्के महाराज, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास वीज महावितरण उप अभियंता मा.योगेश कासलीवाल ,मोहा गावचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, संस्थेचे सल्लागार मा.अरुण डोळस तरडगाव मा. सरपंच संगीता केसकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे शाल, श्रीफळ, व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. जागतीक…
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रताप ढाकणे यांच्या संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी बोलतांना केले. महालोकवाणी न्यूज पाथर्डी प्रतिनिधी सोमराज बडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे प्रताप ढाकणे यांच्या संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी पाथर्डी (pathrdi) येथे आले, होते यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधताना माननीय अजित पवार बोलत होते यावेळी अनेक नेते या मंचावर उपस्थित होते प्रचंड असा जनसमुदाय जमला होता, यावेळी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांना हात घातला, पाथर्डी शहराच्या पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर २०२२ मध्ये आमच्या सरकारने मजुरी दिली.तसेच भगवानगड व ४६ गांवे पाणीपुरवठा योजना तांत्रिक मंजुरीस आम्हीच मान्यता दिली. परंतु काही लोक ती आम्हीच योजना सुरू केली असे सांगत जंरलतेची दिशाभूल करत…
आरोग्य तपासणी शिबीरास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – लक्ष्मीताई पवार जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जनविकास सेवाभावी संस्था जामखेड आयोजित वार- बुधवार दि. 8 मार्च रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या पाठीमागे , जांभळे कॉम्पलेक्स येथे आरोग्य तपासणी शिबीर व महिलांचा सन्मान करण्यात आले. यामध्ये विशेष विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या आदर्श माहिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. ब्रम्ह कुमारी भारती दिदी (ओमशांती, जामखेड), ब्रम्ह कुमारी सिमा दिदी(ओमशांती, जामखेड), श्रीम. शोभा कांबळे( मुख्याध्यापिका- शासकीय मुलांची निवासी शाळा, आरोळे नगर), श्रीम. गिता रासने( मुख्याध्यापिका- जि.प. प्राथ.शाळा, सदाफुले वस्ती), श्रीम.सुल्ताना शेख ( पर्यवेक्षिका, आरोळे हॉस्पिटल) श्रीम. वैशाली…
सुश्मिता शिंदे यांचा शेवगाव येथे विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सत्कार महालोकवाणी न्यूज: महाराष्ट्र राज्य चर्मकार विकास संघ शेवगाव, शब्दगंध साहित्यिक परिषद शाखा शेवगाव, रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री व अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ वतीने सुश्मिता मच्छिंद्र शिंदे हिची आय डी बी आय बँक मधे असिस्टंट मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हरीभाऊ नजन शेवगाव तालुकाध्यक्ष शब्दगंध साहित्यिक परिषद, संतोष कगंणकर तालुकाध्यक्ष चर्मकार विकास संघ, वैभव रोडी जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, सलिम शेख, भाऊसाहेब पाचरणे, दिनेश तेलुरे, रावसाहेब सातपुते, उध्दव गुजर, संतोष कानडे, संदिप सोनवणे, मच्छिंद्र शिंदे, दमयंती शिंदे, सुरेखा कानडे, कमल कानडे,…
धनराज पवार : महालोकवाणी न्यूज अहमदनगर (जिमाका ) दि. ७ भारतीय हवामान खात्याने अहमदनगर जिल्हयात दि ७ ते ९ मार्च, २०२३ या कालावधीमध्ये वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा तसेच गारपीटीसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली असल्याने जिल्हयातील नागरीकांना पुढील प्रमाणे दक्षता घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. आवाहन मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून व गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर…
ह.भ.प कांताताई सोनटक्के (महाराज) यांची प्रमुख उपस्थिती जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृह जामखेड आयोजित 8 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता निवारा बालगृह,मोहा फाटा,जामखेड येथे माहिला प्रबोधन आयोजित मेळावा चे आयोजन करण्यात आले. अदिशक्तीचे रुप असलेल्या स्त्रीयांमध्ये सर्व विश्व सामावले आहे. स्त्रीयांमुळेच विश्वाची निर्मिती झाली आहे. अशा या स्त्रीत्वाचा गौरव व्हावा यासाठी महिला प्रबोधन मेळावा कार्यक्रमामध्ये कायदे, आरोग्य, आहार, बेटी बचाओ, बेटी पढाओ व्याख्यान व जनजागृती व विविध विषयांवर हभप कांताताई सोनटक्के महाराज (भवरवाडी) यांचे मार्गदर्शन महिलांना लाभणार आहे. तसेच निराधार महिलांना शिलाई मशिन,पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ह.भ.प…
आमदार रोहित पवार यांनी ६० व्या वाढदिवसानिमित्त कोठारींचा केला सत्कार महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी धनराज पवार यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले मी अधिवेशनामुळे कोठारी यांच्या वाढदिवसाला येऊ शकलो नाही त्यामुळे आज आवर्जून मी आमची टीम घेऊन संजय कोठारी यांच्या ऑफिसमध्ये येऊन सत्कार केला कोठारी यांचे काम पाहता ते अहोरात्र अपघातातील लोकांना वाचवण्याचे काम करतात अहोरात्र स्वतःची रुग्णवाहिका घेऊन स्वतःच जातात तसेच कोरोना काळामध्ये त्यांनी भरपूर काम केले जीवाची परवा न करता काम केले परवा माझे येणे झाले नाही माझे पिताश्री राजेंद्रजी पवार साहेब मोफत हाडांची शिबिरास हजर होते कोठारी यांनी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि संचेती हॉस्पिटल पुणे…