महालोकवाणी न्युज :- मनपा स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांचा राजीनामा 9 नवीन सदस्य, नगरसेवक सुनील त्र्यंबके यांना संधी. नगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती कुमार सिंह वाकळे यांनी सर्वसाधारण सभेत राजीनामा दिला असून मनपाच्या महासभेमध्ये नवीन नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे संपत बारस्कर, सुनील त्र्यंबके,नजीर शेख, शिवसेनेच्या सुवर्णा गेणाप्पा, सुनीता कोतकर, कमल सप्रे यांची वर्णी लागली आहे. भाजपाच्या पल्लवी जाधव, प्रदीप परदेशी तर बसपाचे मुदत्सर शेख यांची निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक सुनील त्रंबके यांनी केलेल्या प्रभागातील कामामुळे त्यांची निवड झाली असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज: नगर – पंढरीची पहिली वारी महादेवांनी केली. धर्म शास्त्रात योग-याग, जप, अनुष्ठान असे देव प्राप्तीचे अनेक खडतर मार्ग आहेत. पण देव प्राप्तीचा सोपा मार्ग हा नामस्मरण आहे. महादेवांपासूनच वारकरी सांप्रदायाची सुरुवात झाली आहे, असे निरुपण हभप सिद्धनाथ मेटे महाराज यांनी केले. पाईपलाईन(Piplineroad) रोडवरील श्रीराम चौकात आयोध्यानगरीत महाशिवरात्री उत्सवानिमित्त सुरु असलेल्या सप्ताहात किर्तन सोहळ्यात हभप सिद्धनाथ मेटे महाराज यांचे किर्तन झाले. यावेळी भाविकांची गर्दी होती. किर्तनात हार्मोनियम वादक दत्तात्रय खांदवे, पखवाज वादक हभप ठाणगे महाराज, गोरक्षनाथ महाराज दुतारे व टाळकर्यांनी साथ दिली.हभप मेटे महाराजांनी भगवान शिवशंकराच्या अनेक लिला आपल्या किर्तनातून सांगितल्या. महाशिवरात्रीचे महत्व सांगून महादेव हा भोळा आहे, पण…
केसरीवाड्यातील बैठकीत गिरीश बापट बुधवारीआले तेव्हा त्यांच्या नाकात ऑक्सिजनची नळी होती. व्हिलचीअरवर बसून त्यांना आणण्यात आले. यावेळी अंग थरथरत होते. यावेळी बोलताना खासदार म्हणाले की, गेली तीन महिने प्रकृती बरी पण मी खूप कमी काम केलंय. मला दोन ते तीन वेळा डायलिसिस आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिलाय. या निवडणुकीत मी वैयक्तिकरित्या फिरून प्रचार करू शकणार नाही. महिलांना अश्रू अनावर केसरी वाड्यात गिरीश बापट बैठकीला हजर झाले. बैठक भावनिक झाली होती. व्हिलचेअरवर असलेल्या बापट यांनी छोटे भाषण केले. ते ऐकताना पदाधिकारी गंभीर झाले होते. गिरीश बापट यांचे भाषण सुरू असताना महिलांना अश्रू अनावर झाले. काय आहे बापट यांचे…
जामखेड तालुका प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड येथील एसटी स्टँड मध्ये एक अनोळखी व्यक्ती बडबडत असल्याचे निलेश वनारसे यांच्या लक्षात आले त्याच्या अंगावर कपडे नव्हते थंडीने काकडून पॅरेलेस झाला असावा असा अंदाज आल्याने निलेश वनारसे याने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना शुक्रवार १७/२/२०२३ रोजी सकाळी६:०० सहा वाजता मोबाईल वर माहिती दिली सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन ताबडतोब बस स्टॅन्ड वर आले असतात त्यास आपल्या रुग्णवाहिकेत घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले. व्यक्तीशी चर्चा केली असता त्यांनी त्याचे नाव श्रावण हरिभाऊ उजगरे भीम नगर परळी असे सांगितले असून त्याच्या मुलाशी कॉन्टॅक्ट झालेला आहे त्याने जामखेडला काही अडचणीमुळे येण्यास नाकार दिला…
जामखेड तालुका प्रतिनिधी: धनराज पवार कर्जत-जामखेड : इंदौर येथील होळकर राजघराण्याकडून गेल्या 250 वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशातील 12 ज्योतिर्लिंगे आणि पंढरपुरातील विठ्ठल मुर्तीवर महाशिवरात्रीनिमित्त गंगेच्या पाण्याचा (गंगाजल) महाअभिषेक केला जातो. यंदा होणाऱ्या महाअभिषेक सोहळा आणि विठ्ठल पुजेचा मान कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती आशाताई राम शिंदे यांना मिळाला आहे. येत्या 18 फेब्रुवारी 2023 रोजी पंढरीच्या विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती होळकर ट्रस्टचे पंढरपूर येथील व्यवस्थापक आदित्य फत्तेपुरकर यांनी दिली. इंदौर येथील होळकर राजघराण्याकडून गेल्या 250 वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशातील 12 ज्योतिर्लिंगे आणि पंढरपुरातील विठ्ठल मुर्तीची महाशिवरात्रीनिमित्त महापूजा केली जाते.यासाठी इंदोर येथील होळकर…
महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधि: धनराज पवारजामखेड नगरपरिषदेकडून, शहरातील विकास कामांना व सोयी सुविधाच्या निधीसाठी, जामखेड नगरपरिषदेच्या वसुली पथकाकडून आगळ्या वेगळया स्वरूपात जाहीर आवाहन करण्यात आले.जामखेड नगर परिषदेने रिक्षा द्वारे, थकबाकी व चालू कर वसुलीसाठी शहरातून जनजागृती अभियान चालू यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पेठ, जुना कोर्ट रोड, बीड रोड,मिलींद नगर, तपनेश्वर रोड, या मार्गाने करण्यात आले. महालोकवाणी न्युजशी बोलताना मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले की, जामखेड नगरपरिषदेची अर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. मागील अर्थिक वर्षात वसुली फक्त 8 टक्के होती. आता जानेवारी 23 अखेर ती 16 टक्के आहे. मालमत्ता थकबाकी 4 कोटी 90 लाख 67 हजार व चालू । कोटी 68 लाख आहे.…
महालोकवाणी न्यूज: सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. या प्रकरणावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. 7 जणांच्या घटनापीठाकडे निर्णय जाणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे. नबाम रेबियाचा संदर्भ का घेऊ नये असे तुम्हाला वाटते? जेठमलानी: 28 जून रोजी राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट करण्याचे आदेश दिले.. तर स्पीकरला आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार होता का? कोर्ट : सात सदस्य खंडपीठाकडे पाठवायचे की नाही? जेठमलानी – विधानसभा उपाध्यक्ष वतीने पाठविण्यात आलेले नोटीस यांची सत्यता तपासण्याची गरज आहे अविश्वास ठराव आणलेले आमदारांच्या स्वाक्षरी तपासल्या तर…
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व्यवस्थापनकायम प्रयत्नशील – अॅड.वसंतराव कापरे महालोकवाणी न्यूज:नगर – डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे अभ्यासक्रमाचे विविध पैलू शिकविण्याची व शिकण्याची आधुनिक पद्धत तसेच संशोधनातील नविनता व त्याचा विस्तार, शिक्षण संसाधने आणि विद्यार्थ्यांच्या आधुनिक विषयातील प्रगतीसाठी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे व्यवस्थापन सतत प्रयत्नशील असल्याने महाविद्यालयास ए+ मानांकन मिळाले ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन फौंडेशनचे विश्वस्त अॅड.वसंतराव कापरे यांनी केले. विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅक कमिटीचे ए+ मानांकन प्रमाणपत्र मिळाले याप्रसंगी फौंडेशनचे उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक, डॉ.अंकुश शिर्के, डॉ.रविंद्र नवथर, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.अॅड.कापरे पुढे म्हणाले, नॅशनल व इंटरनॅशनल स्तरावरील पेपर…
महालोकवाणी न्यूज: फुंडे-दिनांक-१५ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयात वीर वाजेकर पुण्यतिथी व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी व विचारवंत प्राध्यापक अशोक बागवे उपस्थित होते. त्यांच्या समवेत कवी नारायण लाळे, सतीश सोलापूरकर त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. बाळाराम पाटील( माजी शिक्षक आमदार, रायगड विभाग सल्लागार समिती, रयत शिक्षण संस्था सातारा) प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते मा. श्री .रामशेठ ठाकूर( सदस्य मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था सातारा)मा.श्री.कृष्णा कडू, मा. श्री. सुधीर सेठ घरत, मा. श्री. कॉम्रेड भूषण पाटील,मा. भावणताई घाणेकर,मा.श्री.मेघनाथ तांडेल, मा.श्री.उमेश म्हात्रे,शैलजा सुधीर घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य,डॉ.प्रल्हाद पवार यांनी आपल्या प्रस्ताविकातून,वीर वाजेकर यांचे जीवनचरित्र…
महालोकवाणी न्यूज:- रस्ता सुरक्षा ही एक व्यापक आणि महत्त्वाची समस्या आहे जी जनजागृती करण्यासाठी, विशेषतः तरुण पिढीमध्ये शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि इतर यासारख्या असंख्य विषयांशी संबंधित आहे. प्रत्येकजण, विशेषत: लहान मुले आणि तरुण लोक ज्यांना गंभीर कार अपघातांचा धोका आहे, त्यांनी रस्त्याच्या नियमांशी परिचित असले पाहिजे. उत्पादन असे प्रतिपादन श्री सुरज उबाळे असिस्टंट इन्स्पेक्टर आरटीओ अहमदनगर यांनी श्री छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना आयोजित राष्ट्रीय रस्ते सुरक्षा कार्यक्रमात केले. यावेळी असिस्टंट इन्स्पेक्टर प्रियंका उनवणे, प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे ,विभाग प्रमुख प्रा ए बी काळे , प्रा पी जी निकम, प्रा एस एम वाळके, प्रा वाय सिसोदिया उपस्थित होते आधी उपस्थित होते पुढे बोलताना श्री उबाळे म्हणाले की,आजच्या जगात रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत, ज्याचे मुख्य कारण म्हणजे रस्ता सुरक्षेकडे लक्ष न देणे. ड्रायव्हरचा बेजबाबदारपणा, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळे रस्ते अपघात दिवसेंदिवस कसे वाढत आहेत आणि ते कमी करण्यासाठी रस्त्यावरती नियमांचे उल्लंघन करणे हे किती घातक असून त्यामुळे आपल्या जीवनास आपण मुकु शकतो हेही त्यांनी सांगितले. रस्ता सुरक्षा मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अनोखी भूमिका आहे कारण महाविद्यालयीन विद्यार्थी हे रस्त्यावरती चालताना गाडी वेगात चालवणे वाहतुकीचे नियमांचे पालन करणे सर्रासपणे करताना दिसतात आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून भविष्यातील सुजाण ना गरिक वाहतुकीचे नियमांचे पालनच करतील त्यांनी व्यक्त केली. आकडेवारीनुसा र, बहुतेक वाहतूक अपघातांच्या घटनांमध्ये मुले गुंतलेली असतात कारण ते इतर वयोगटांपेक्षा अधिक असुरक्षित असतात. त्यांना लहानपणापासूनच रस्ता सुरक्षा शिक्षण आणि समज आवश्यक आहे. असिस्टंट इन्स्पेक्टर प्रियंका उनवणे यांनी , महाविद्यालयीन विद्यार्थी तथा यांनी रस्ते सुरक्षा संदर्भ माहिती देताना रहदारीच्या परिस्थितीत रस्त्यावरून वेगात जाणाऱ्या महाविद्यालयीन तरुण तरुणी ह्या गाफील असतात , विशेषतः जेव्हा ते वाहना समोरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांच्या जीवाला गंभीर धोका होण्याची शक्यता असते आणि हे वाहतुकीचे छोटेसे नियम आपण वेळोवेळी बघणे महत्त्वाचे ठरतात. त्याबरोबरच यामध्ये पालकांचीही महत्त्वाची जबाबदारी असून त्यांनीही आपला पाल्य रहदारीच्या ठिकाणी गाडी कटाक्ष नजर ठेवून वाहन चालवतोय की नाही याची माहिती घेणे अत्यावश्यक ठरते. फक्त मी आणि माझं ही भावना न ठेवता आपली ही वाट बघणार घरी कोणीतरी आहे विशेषता या तरुणांनी घ्यावी त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे यांनी रस्ते सुरक्षा महाविद्यालयीन तरुणाच्या दृष्टीने महत्व व त्या दृष्टीने महाविद्यालयाने घेतलेल्या पाऊला बद्दल महत्व अधोरेखित करताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हे रस्ते वाहतुकीबद्दलच्या नियमांचा काटेकोर पालन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली व पाहुण्यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे यांनी रस्ते सुरक्षा महाविद्यालयीन तरुणाच्या दृष्टीने किती व त्या दृष्टीने महाविद्यालयाने घेतलेल्या पाऊला बद्दल महत्व अधोरेखित करताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हे रस्ते वाहतुकीबद्दलच्या नियमांचा काटेकोर पालन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली व पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिविल विभागातील विद्यार्थी विशाल आव्हाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब पटेल या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना चे समन्वयक प्रा गिरीश पाटील, प्रा. ए कुलकर्णी , प्रा एम मांढरे प्रा एस आगळे यांनी परिश्रम घेतले मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.