बीडbeed जिल्ह्यातील मस्साजोग Massajog गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरी आरोपींना शिक्षा झालेली नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. त्यांच्या 7 मागण्यांमध्ये पोलिसांवरील कारवाई आणि जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचा समावेश आहे. दोन दिवसांत सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा देण्यात आला आहे. Jamkhed |जामखेड हादरले दोन जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये एक पोलीस कर्मचारी Massajog | मस्साजोग ग्रामस्थांच्या कोणत्या 7 मागण्या जाणून घ्या फरार कृष्णा आंधळेला अटक करा, आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करा, हे प्रकरण फास्ट ट्रॅक…
Author: mahalokwani
अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये Jamkhed आज पहाटे दुर्देवी घटना घडली आहे. कार डिव्हायडरला धडकल्यामुळे सीएनजीने पेट घेतला अन् दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. Jamkhed |जामखेड हादरले दोन जणांचा होरपळून मृत्यू; मृतामध्ये जामखेड पोलिस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीडहून जामखेडच्या दिशेने येणाऱ्या कारने डिव्हायडरला जोरदार धडक दिली. भीषण धडक बसल्यानंतर सीएनजीने पेट घेतला अन् कारला भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्यूमध्ये जामखेड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महादेव दत्ताराम काळे आणि जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल अशी मृताची नावे आहेत. सोमवारी पहाटे ४ वाजता अपघात झाला.आग इतकी भीषण…
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय Budget 2025 अधिवेशन सोमवार दि. ३ ते २६ मार्च २०२५ या कालावधीत मुंबईत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्चला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. Nakli note|अहिल्यानगर जिल्ह्यातील या तालुक्यात नकली नोटाची छपाई; पोलिसांनी आवळल्या मुसक्या Budget 2025| राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन या दिवशी होणार विधानभवन, मुंबई येथे झालेल्याविधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनBudget 2025 कालावधीत…
अहिल्यानगर : प्रतिनिधी गुंडगिरी पध्दतीने पोलीस व महसूल प्रशासनाचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नागरीकांच्या मालमत्ता जमीनदोस्त करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे सांगत नगर जिल्हयाचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार नीलेश लंके Nilesh lanke यांनी संताप व्यक्त केला. Nilesh lanke|अतिक्रमणा आडून राजकीय खुन्नस काढण्याचा डाव गुंडगिरी पध्दतीने, पोलीस, महसूल प्रशासनाचा वापर करून कोणतीही नोटीस न देता सकाळी सात वाजता बुऱ्हानगर येथील अभिषेक भगत यांचे अडीच ते तीन कोटी रूपयांचे मंगल कार्यालय उध्वस्त करण्यात आले त्यानंतर खा. नीलेश लंके यांनी शनिवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेउन राजकीय आकसातून अशी कारवाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पदाचा दुरुपयोग करून गुन्हेगारी वर्तन केल्या प्रकरणी अहिल्यानगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.याबाबत आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी (ता. २१) फेब्रुवारी रोजी आदेश काढले आहेत.तसेच चौकशी समितीने २७ मुद्यांवर आक्षेप नोंदविला आहे १५ व्या वित्तआयोगाचा १६ लाख १५ हजार रुपयांचा निधी शासकीय खात्यात वर्ग न करता तो निधी स्वतःच्या फायद्यासाठी संगनमत करून स्वतःच्या खात्यात वर्ग करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात डॉ.अनिल बोरगे,विजयकुमार महादेव रणदिवे (कंत्राटी लेखा व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान,महापालिका) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत डॉ.सतीश बाबुराव राजूरकर (प्र.आरोग्य अधिकारी, महापालिका) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. १५…
अहिल्यानगर (दि.21 फेब्रुवारी):-पाईपलाईनरोड येथील कादंबरी नगरी इस्कॉन मंदिर शेजारी हिंदू योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शिव भगिनी सौ.मंगल राजेंद्र शेडाळे यांच्या वतीने सर्व शिवभक्तांना अन्नदान करण्यात आले.हिंदू योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने सौ. शेडाळे यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.यावेळी डॉ.राहुल कुलकर्णी म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक अडचणींवर मात करुन आपल्या शौर्याने स्वराज्य उभारले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योध्दा नव्हे, तर अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांनी आपल्या आदर्शवत राज्यकारभाराने रयतेच्या मनावर राज्य केले.अठरापगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली.त्यांचे विचार व कार्य समाजासाठी दिशादर्शक…
पुणे पथकाची जिल्ह्यात कारवाई एक जण ताब्यात:100 आणि 500 रुपयांच्या नोटा छापल्या व्यवस्थित छापल्या नसल्याने फाडून टाकल्या कचऱ्याच्या डब्यात अहिल्यानगर (दि.21 प्रतिनिधी):- संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडील रहाणे मळा येथे एकाने बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद तस्करीच्या स्वरूपाने भारतात आलेला असताना तो कागद कुरिअरच्या माध्यमातून संगमनेर येथे मागवून प्रिंटरच्या सहाय्याने भारतीय चलनातील बनावट नोटा Nakli note बनविण्याचा प्रयत्न केला.परंतु एका घरात तयार करणाऱ्या इसमावर छापा घालून त्याला पकडण्यात आले आहे. डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स पुणे च्या पथकाने ही कारवाई आज सकाळी केली आहे.रजनीकांत राजेंद्र रहाणे (रा. राहणे मळा, गुंजाळवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे.सदर घराच्या पहिल्या…
सुरेश धस Suresh Dhas यांना आम्ही खूप जीव लावला होता, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. मंत्री धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर सवाल केला असता मनोज जरांगे पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे. Poem| आपल्याला पण वाटते ना ! एकदा मना सारखे व्हावे- कवियत्री मोनाली खरड Suresh Dhas| त्या नासक्याच नाव घेऊ नका आज शिवजंयती सारखा चांगला दिवस असून त्यामुळे क्रूर आणि नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीकास्त्र डागलंय. धाराशिव मधील कळंब याठिकाणी भगवा ध्वज फडकावत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिवजयंती सोहळ्याची सुरुवात करून जल्लोष साजरा…
कधी कधी वाटतं मला ,एकदा माझ्या मनासारखे व्हावे …… जेव्हा मनात येईल तेव्हा बाहेर जावे,आकाशातल्या पाखरा सारखे उंच उडून पहावे,कोणतेच स्वप्न माझे अधुरे न राहावे,एकदा तरी माझ्या मनासारखे व्हावे…… संस्काराचा पिंजरा माझ्यापासून लांब असावा,आयुष्याचा एक दिवस आपला का नसावा,मोकळा श्वास मला घेऊन द्यावे,एकदा तरी माझ्या मनासारखी व्हावे…… कधी वाटतं मला स्वप्नात जगावे,सगळ्या कौतुक वाटेल असे काही बनावे,आकाशातील तारा बनवून सगळ्यांना पहावे,एकदा तरी माझ्या मनासारखे व्हावे…… कल्पनेच्या स्वप्नातून बाहेर न यावे,कोणताच विचार न करता मनमोकळे फिरावे,मनाला वाटण त्याचे गोष्टी करावे,प्रेम होईल सगळ्यांना असे मी जगावे,एकदा तरी माझ्या मनासारखे व्हावे… कवियत्री :- मोनाली खरड
संतोष देशमुख Santosh Deshmukh हत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती लागली असून फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कृष्णा आंधळेच्या नावावर 5 वाहने तसेच धारुर आणि केजमध्ये बँक खाते आहेत. Nagar-pune| नगर पुणे महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये बसवून लुटमार करणारी टोळी जेरबंद Santosh Deshmukh|संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सीआयडी अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाने आदेश दिले आहेत. कृष्णा आंधळेच्या नावावर 5 वाहने तसेच धारुर आणि केजमध्ये बँक खाते आहेत.…