Author: mahalokwani

मुंबई : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठी घोषणा केली आहे. 2023 मध्ये आय़ोगाकडून तब्बल 8 हजार 169 पदाच्या भरतीसाठी जाहीरात काढण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आय़ोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलीय. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र राजपत्रित गट ब आणि क साठी संयुक्त परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी होईल. राज्यातील 37 जिल्ह्यात केंद्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. याशिवाय अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी आणि क गट सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. एमपीएससीकडून…

Read More

मायक्रोसॉफ्ट कंपनीत २१ वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या एका भारतीय व्यक्तीने नोकरी गमावली आहे. नोकरीवरून काढल्यानंतर संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून मायक्रोसॉफ्ट कंपनीचे आभार मानले आहेत.संबंधित व्यक्तीने पोस्टमध्ये लिहिलं की, “आज मला मायक्रोसॉफ्ट कंपनीतुन नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. याबाबत विचार करताना, मला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त कंपनीबाबत कृतज्ञतेची भावना वाटत आहे. ऐकावं ते नवलंच; चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा.. शिक्षण संपल्यानंतर मी पहिल्यांदाच मायक्रोसॉफ्ट कंपनीत रुजू झालो होतो. विदेशी भूमीवर नोकरीसाठी गेल्यानंतर माझा सुरुवातीचा अनुभव कसा होता? तो आजही मला आठवतो. मायक्रोसॉफ्टमध्ये २१ वर्षांहून अधिक काळ काम करताना मला अनेक…

Read More

नगर कॉलेज मधली घटना ; घटनास्थळी कोतवाली पोलीस दाखल नगर ता.20 – महालोकवाणी न्यूज अहमदनगर मध्ये कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे नुकतेच नगर शहरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी दोन गटांमध्ये तुफान हाणामाऱ्या होऊन दगडफेक झाली ही घटना शांत होत नाही नायब तहसीलदारला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न..! तोच पुन्हा अहमदनगर शहरातील प्रसिद्ध अशा अहमदनगर कॉलेजमध्ये दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी शुल्लक कारणावरून दोन गटात तुफान हाणामाऱ्या झाल्या नेमकं हाणामाऱ्याचं कारण समोर आलं नाही सदर घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये वाद करणाऱ्यांविरुद्ध तपास करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे

Read More

महालोकवाणी न्यूज:- बीड बीड जिल्ह्यातील केजमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यामुळे केजमध्ये या प्रकरणाची चर्चा होत आहे. कौटुंबिक वादातून आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानेच त्यांच्यावर हल्ला केला होता.  7th Pay Commission: बजेट-2023 मध्ये फिटमेंट फॅक्टरवर होणार मोठी घोषणा, मूळ वेतन जाणार 26 हजारांवर ! केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली आहे. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आशा…

Read More

भारताचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget-2023) सादर होणार आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत देशाचा हाच लेखाजोखा मांडणार आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचारीही अर्थसंकल्प सादर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कर्मचाऱ्यांना आशा आहे की, अर्थसंकल्पानंतर त्यांच्या फिटमेंट फॅक्टरच्या मागणीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. असे झाल्यास त्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते. ▶ अर्थसंकल्पानंतर घोषणा होण्याची शक्यता..देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर बजेटनंतर फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकार निर्णय घेऊ शकते. 2022 च्या पहिल्या वर्षाच्या शेवटी सरकारकडून याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा होती, पण ती होऊ…

Read More

नवी दिल्ली : महागाईविरोधात केंद्र सरकारने अनेक आघाड्यांवर मोर्चा उघडला आहे. गेल्या सात महिन्यात इंधन दरवाढ झाली नसली तरी पेट्रोल-डिझेलच्या किंमती मात्र कमी झालेल्या नाहीत. तर महागड्या खाद्यतेलावर मात्र केंद्र सरकारला उपाय सापडला आहे. मध्यंतरी किचन बजेट कोलमडणाऱ्या खाद्यतेलावर केंद्र सरकारने तोडगा काढला आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्याने कमी होत आहे. मोहरी, शेंगदाणा आणि इतर खाद्यतेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाचे भाव जमिनीवर येतील, असा विश्वास बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. देशात सोयाबीन, शेंगदाणा, मोहरी, तीळ, सूर्यफुल, करडी आणि इतर तेल खाण्यात येते. सीलबंद अथवा घाण्याच्या तेलाचा वापर करण्यात येतो. मध्यंतरीच्या काळात तेलाचे भाव गगनाला भिडले होते. त्यातच…

Read More

आपल्या शरीरात असलेली थायरॉईड ग्रंथी अनेक प्रकारचे हार्मोन्स बनवते. हे हार्मोन्स शरीरातील अनेक क्रिया नियंत्रित करतात. शरीरातील थायरॉईडची पातळी जास्त वाढणे किंवा कमी होणे हा थायरॉईड रोग आहे. थायरॉईड रोग महिलांमध्ये खूप सामान्य आहे. यामुळे त्रस्त महिलांना झपाट्याने वजन वाढणे आणि गळणे, अशक्तपणा आणि केस गळणे यासारख्या समस्या असतात, परंतु थायरॉईडचा आजार पुरुषांमध्येही दिसून येतो. याचा परिणाम पुरुषांच्या लैंगिक जीवनावरही होतो. Free Condoms: १८ ते २५ वयोगटातील सर्वांना मिळणार फ्री कंडोम! ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींनी केली घोषणा ! थायरॉईड संप्रेरकांची कमतरता किंवा थायरॉईड नियंत्रणाबाहेर असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. याचा पुरुषांच्या लैंगिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. थायरॉईड संप्रेरकांची उच्च पातळी गोनाडोट्रोपिन…

Read More

नवी दिल्ली : विनेश फोगटला भारताची ‘गोर्ल्डन गर्ल’ विनेश फोगटने एक धक्कादायक खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गेल्यावर आपले कसे शोषण झाले आणि त्यामुळे मला रोज आत्महत्या कराविशी वाटायची, असे धक्कादायक वक्तव्य विनेशने केले आहे. यावेळी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याचबरोबर खेळाडूंबरोबर ते जेव्हा हॉटेलमध्ये राहायचे तेव्हा नेमकं काय घडायचं, हे सत्यदेखील तिने आता सर्वांसमोर सांगितले आहे. राखी सावंतला अटक..! भारताचा तिरंगा घेऊन जे खेळाडू देशाची शान वाढवतात त्यांच्यावर आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. कारण ब्रिजभूषण सिंग यांनी केलेल्या अन्यायाबाबत त्यांनी आता दाद मागायचे ठरवले आहे. त्यासाठी ब्रिजभूषण सिंग हॉटेलच्या रुममध्ये…

Read More

महालोकवाणी न्यूज:- राखी सावंतला आज अटक करण्यात आली आहे. अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली असून एका मॉडेलचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक ड्रामा क्वीन’ म्हणून ओळख असणारी अभिनेत्री राखी सावंत सावंतआज अटक करण्यात आली आहे. अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली असून एका मॉडेलचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक झाली आहे. राखी सावंतने माझ्यावर अनेक खोटे आरोप केले, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, माझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले, असे म्हणत राखी सावंतविरोधात मॉडेल शर्लिन चोप्राने तक्रार केली. जेव्हा जेव्हा मी कोणाच्या विरोधात आवाज उठवला तेव्हा राखी सावंतने मला रोखण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या अंतर्गत आम्ही आंबोली…

Read More

सामाजिक कार्य करणार्यांना पुरस्कार दिल्याने प्रोत्साहन मिळते – माधवराव लामखडे महालोकवाणी न्यूज:- नगर – सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे डोंगरे बहुउद्देशिय संस्था चांगले काम करत आहे. साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून योगेश पिंपळे हे धार्मिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत आहेत. कोरोना काळात माणुसकीचे दर्शन घडवित जनआरोग्य फौंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देत सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत दिलेला पुरस्कार त्यांच्या कार्याचे कौतुक करणारा आहे, असे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य माधवराव लामखडे यांनी केले.निमगांव वाघा येथील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने युवा दिनानिमित्त साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे यांना स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव राज्यस्तरीय पुरस्कार…

Read More