भारताचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget-2023) सादर होणार आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत देशाचा हाच लेखाजोखा मांडणार आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचारीही अर्थसंकल्प सादर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कर्मचाऱ्यांना आशा आहे की, अर्थसंकल्पानंतर त्यांच्या फिटमेंट फॅक्टरच्या मागणीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. असे झाल्यास त्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते. ▶ अर्थसंकल्पानंतर घोषणा होण्याची शक्यता..देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर बजेटनंतर फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकार निर्णय घेऊ शकते. 2022 च्या पहिल्या वर्षाच्या शेवटी सरकारकडून याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा होती, पण ती होऊ…
Author: mahalokwani
नवी दिल्ली : महागाईविरोधात केंद्र सरकारने अनेक आघाड्यांवर मोर्चा उघडला आहे. गेल्या सात महिन्यात इंधन दरवाढ झाली नसली तरी पेट्रोल-डिझेलच्या किंमती मात्र कमी झालेल्या नाहीत. तर महागड्या खाद्यतेलावर मात्र केंद्र सरकारला उपाय सापडला आहे. मध्यंतरी किचन बजेट कोलमडणाऱ्या खाद्यतेलावर केंद्र सरकारने तोडगा काढला आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्याने कमी होत आहे. मोहरी, शेंगदाणा आणि इतर खाद्यतेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाचे भाव जमिनीवर येतील, असा विश्वास बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. देशात सोयाबीन, शेंगदाणा, मोहरी, तीळ, सूर्यफुल, करडी आणि इतर तेल खाण्यात येते. सीलबंद अथवा घाण्याच्या तेलाचा वापर करण्यात येतो. मध्यंतरीच्या काळात तेलाचे भाव गगनाला भिडले होते. त्यातच…
आपल्या शरीरात असलेली थायरॉईड ग्रंथी अनेक प्रकारचे हार्मोन्स बनवते. हे हार्मोन्स शरीरातील अनेक क्रिया नियंत्रित करतात. शरीरातील थायरॉईडची पातळी जास्त वाढणे किंवा कमी होणे हा थायरॉईड रोग आहे. थायरॉईड रोग महिलांमध्ये खूप सामान्य आहे. यामुळे त्रस्त महिलांना झपाट्याने वजन वाढणे आणि गळणे, अशक्तपणा आणि केस गळणे यासारख्या समस्या असतात, परंतु थायरॉईडचा आजार पुरुषांमध्येही दिसून येतो. याचा परिणाम पुरुषांच्या लैंगिक जीवनावरही होतो. Free Condoms: १८ ते २५ वयोगटातील सर्वांना मिळणार फ्री कंडोम! ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींनी केली घोषणा ! थायरॉईड संप्रेरकांची कमतरता किंवा थायरॉईड नियंत्रणाबाहेर असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. याचा पुरुषांच्या लैंगिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. थायरॉईड संप्रेरकांची उच्च पातळी गोनाडोट्रोपिन…
नवी दिल्ली : विनेश फोगटला भारताची ‘गोर्ल्डन गर्ल’ विनेश फोगटने एक धक्कादायक खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गेल्यावर आपले कसे शोषण झाले आणि त्यामुळे मला रोज आत्महत्या कराविशी वाटायची, असे धक्कादायक वक्तव्य विनेशने केले आहे. यावेळी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याचबरोबर खेळाडूंबरोबर ते जेव्हा हॉटेलमध्ये राहायचे तेव्हा नेमकं काय घडायचं, हे सत्यदेखील तिने आता सर्वांसमोर सांगितले आहे. राखी सावंतला अटक..! भारताचा तिरंगा घेऊन जे खेळाडू देशाची शान वाढवतात त्यांच्यावर आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. कारण ब्रिजभूषण सिंग यांनी केलेल्या अन्यायाबाबत त्यांनी आता दाद मागायचे ठरवले आहे. त्यासाठी ब्रिजभूषण सिंग हॉटेलच्या रुममध्ये…
महालोकवाणी न्यूज:- राखी सावंतला आज अटक करण्यात आली आहे. अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली असून एका मॉडेलचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक ड्रामा क्वीन’ म्हणून ओळख असणारी अभिनेत्री राखी सावंत सावंतआज अटक करण्यात आली आहे. अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली असून एका मॉडेलचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक झाली आहे. राखी सावंतने माझ्यावर अनेक खोटे आरोप केले, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, माझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले, असे म्हणत राखी सावंतविरोधात मॉडेल शर्लिन चोप्राने तक्रार केली. जेव्हा जेव्हा मी कोणाच्या विरोधात आवाज उठवला तेव्हा राखी सावंतने मला रोखण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या अंतर्गत आम्ही आंबोली…
सामाजिक कार्य करणार्यांना पुरस्कार दिल्याने प्रोत्साहन मिळते – माधवराव लामखडे महालोकवाणी न्यूज:- नगर – सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे डोंगरे बहुउद्देशिय संस्था चांगले काम करत आहे. साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून योगेश पिंपळे हे धार्मिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत आहेत. कोरोना काळात माणुसकीचे दर्शन घडवित जनआरोग्य फौंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देत सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत दिलेला पुरस्कार त्यांच्या कार्याचे कौतुक करणारा आहे, असे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य माधवराव लामखडे यांनी केले.निमगांव वाघा येथील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने युवा दिनानिमित्त साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे यांना स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव राज्यस्तरीय पुरस्कार…
महालोकवाणी न्यूज:- औरंगाबाद औरंगाबाद शहर पोलीस दलातील (Aurangabad City Police) सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP – Assistant Commissioner of विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) यांच्यावर एका महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी रविवारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी आज त्यांना अटक करुन, न्यायालयात हजर केले असता, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपल्याच एका मित्राच्या 30 वर्षीय पत्नीचा ढुमे यांनी छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तर पीडित महिलेच्या तक्रारीनंतर सिटी चौक पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी केली होती. दरम्यान आज सकाळी त्यांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली…
महालोकवाणी न्यूज:- नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पाडली. या स्पर्धेत सर्वच कुस्त्या जोरदार झाल्या. पण, या स्पर्धेत सेमिफानल कुस्तीवरुन नवा वाद सुरू झाला. नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पाडली. या स्पर्धेत सर्वच कुस्त्या जोरदार झाल्या. पण, या स्पर्धेत सेमिफानल कुस्तीमधून नवा वाद सुरू झाला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये पैलवान सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड असा सामना झाला. या सामन्यात सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याचा आरोप सोशल मीडियावर सुरू आहे. या सामन्यावरुन सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एका गटाने सिकंदर शेखवर अन्याय झाल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या गटाने अन्याय झाला नसल्याचे म्हटले आहे. यावरुन आता सोशल मीडियावर चांगलाच…
महालोकवाणी न्यूज:- नगर – आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करुनच अभ्यास केला पाहिजे. घरातून आईने केलेले संस्कार, शाळेतून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी जे ज्ञान दिले आहे ते विद्यार्थ्यांना आयुष्यभर मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन राधाबाई काळे महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य किसन पायमोडे यांनी केले. पंचांनी स्वत:च्या मुलाची शपथ घेऊन सांगावं, तो निर्णय खरा होता का ? वसंत टेकडी येथील श्रीनाथ विद्या मंदिरचे वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन समारंभात प्रमुख अतिथी श्री.पायमोडे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त निर्मलचंद्र थोरात होते. व्यासपीठावर संस्थेचे साई पाउलबुधे, विश्वस्त आर.ए.देशमुख, रामभाऊ बुचकुल, दादासाहेब भोईटे, रघुनाथ कारमपुरी, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, अनुराधा…
महालोकवाणी न्यूज:- 16 जानेवारी 2023 :- पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांवरून महाविकासआघाडीमध्ये खडाखडी झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी झालेल्या गोंधळावरून आणि शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली आहे. तसंच यापुढे असं होणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. या कारणामुळे नाराजी.. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांवरून महाविकासआघाडीमध्ये खडाखडी झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी झालेल्या गोंधळावरून आणि शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली आहे. या निवडणुकांसाठी अमरावती आणि नाशिकमध्ये काँग्रेसचा उमेदवार, कोकणात शेतकरी कामगार पक्ष, नागपुरात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मराठवाड्यात राष्ट्रवादीला तिकीट देण्याचं महाविकासआघाडीचं ठरलं. यातल्या नागपूरच्या जागेसाठी…