Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Edible Oil : खूशखबर, खाद्यतेल झाले स्वस्त; ‘या’ तेलांचे दर उतरले, लवकरच किंमतीत होणार घसरण !

Edible Oil : खूशखबर, खाद्यतेल झाले स्वस्त; ‘या’ तेलांचे दर उतरले, लवकरच किंमतीत होणार घसरण !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 19, 2023Updated:January 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नवी दिल्ली : महागाईविरोधात केंद्र सरकारने अनेक आघाड्यांवर मोर्चा उघडला आहे. गेल्या सात महिन्यात इंधन दरवाढ झाली नसली तरी पेट्रोल-डिझेलच्या किंमती मात्र कमी झालेल्या नाहीत. तर महागड्या खाद्यतेलावर मात्र केंद्र सरकारला उपाय सापडला आहे. मध्यंतरी किचन बजेट कोलमडणाऱ्या खाद्यतेलावर केंद्र सरकारने तोडगा काढला आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्याने कमी होत आहे. मोहरी, शेंगदाणा आणि इतर खाद्यतेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाचे भाव जमिनीवर येतील, असा विश्वास बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

देशात सोयाबीन, शेंगदाणा, मोहरी, तीळ, सूर्यफुल, करडी आणि इतर तेल खाण्यात येते. सीलबंद अथवा घाण्याच्या तेलाचा वापर करण्यात येतो. मध्यंतरीच्या काळात तेलाचे भाव गगनाला भिडले होते. त्यातच इंडोनेशिया, मलेशियाकडून आयात होणारे पामतेलातही खंड पडला होता. त्याचा फटका नागरिकांना बसला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार खाद्यतेलाच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण त्याला योग्य प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आयात होणाऱ्या तेल केंद्र सरकारने शुल्क मुक्त केले आहे. तरीही देशात मोठ्या प्रमाणात तेलाचे दर कमी झालेले नाहीत.

तर सूर्यफुल आणि सोयाबीन तेल अगोदर पैसे जमा करुन खरेदी करावे लागत आहे. या सर्व प्रकारात केंद्र सरकारला महसूली तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरुन काढणे ही आवश्यक आहे. तसेच देशातील ग्राहकांना स्वस्तात खाद्यतेलाचा पुरवठा करणेही आवश्यक आहे.

खाद्यतेलाबाबत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने योजना आखली आहे. आत्मनिर्भर भारत होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पण ते अजूनही तोकडेच आहेत. यंदा खाद्यतेलाचा पुरवठा वाढविण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यंदा तेलबिया वर्गीय पिकांमध्ये 25 टक्क्यांची वृद्धी झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाच्या किंमती अजून ही कमी होणार आहे. नवीन किंमती लवकरच अपडेट होतील. खाद्यतेल येत्या काही दिवसांत 30-70 रुपयांहून स्वस्त होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleथायरॉईडमुळे पुरुषांच्या लैंगिक जीवनावर होऊ शकतो परिणाम, अशा प्रकारे करु शकता बचाव !
Next Article 7th Pay Commission: बजेट-2023 मध्ये फिटमेंट फॅक्टरवर होणार मोठी घोषणा, मूळ वेतन जाणार 26 हजारांवर !
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.