जामखेड तालुक्यात गट शिक्षणाधिकारी पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त होते . पंचायत समितीच्याच्या विस्तार अधिकारी यांचे कडे पदभार होता. नव्याने बदलून आलेले व जामखेड तालुक्यातील रहिवाशी असलेले श्री बाळासाहेब धनवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षक , विद्यार्थी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे . अचानक शाळा भेटी करून काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देत आहेत . जामखेड तालुक्यातील काही अपवाद वगळता सर्व शाळा चांगल्या आहे उदा. प्राथमिक शाळा सारोळा या शाळेचा विद्यार्थी पट पाच वर्षा पूर्वी ३७ होता आज पट १८३च्या पुढे आहे . येथील शिक्षकांनी स्थानिक ग्रामस्याच्या मदतीने लोक सहभागातून शाळेला बगीचा , क्रिंडागण , इमारत बांधकाम केले आहे. या शाळेची…
Author: mahalokwani
अहमदनगर ; संदेशनगर( वसंत टेकडी ) येथील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने उद्या पासून सलग तीन दिवस साई उत्सवाचे आयोजन, करण्यात आले आहे. दिनांक १ जुलै ते ३ जुलै २०२३ च्या दरम्यान साई उत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे, प्रभाग दोन मधील कर्तव्यदक्ष नगरसेवक तशा स्थायी समिती सदस्य अहमदनगर महानगर पालिका मा. सुनील ( भाऊ ) त्र्यबंके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाची जोरदार तयारी चालू आहे , माघील १० वर्षांपासून या उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. स्वतः उभे राहून छोट छोट्या बारीक गोष्टीचे नियोजन हे सुनील त्र्यबंके आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्य यांनी केले आहे , शनिवार दिनांक १ जुलै…
संपादक: सचिन कांबळे शरद पवार Sharad Pawar यांनी भाजपच्या सद्यस्थितीवर संभाजीनगर नगर येथील एका कार्यक्रमात मोठे विधान केलेले आहे . यावेळी त्यांनी २०२४ च्या निवडणुकीमध्ये भाजपाची स्थिती कशी असणार? किती जागा जिकणार ? तसेच चंद्रशेखर राव हे अखंड महाराष्ट्रात फिरतात याचा २०२४ निवडणुकीवर किती परिणाम होणार याचाही शरद पवारांनी खुलासा केला आहे. शरद पवार Sharad Pawar काय म्हणाले याचा सविस्तर आढावा देशातील ट्रेंड हा भाजपाविरोधी देशाचा नकाशा समोर ठेवला तर केरळमध्ये भाजप नाही, तामळनाडूत नाही, कर्नाटकात नाही, तेलंगणात नाही, आंध्रप्रदेश मध्ये नाही, गोव्यातही नव्हती तेथे आमदार फोडून राज्य आणले, महाराष्ट्र बाजूला ठेवा गुजरात मध्ये भाजपची सत्ता आहे हे मान्य करू…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड: धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी भिक्खूंचा प्रभाव जास्त पडतो त्यामुळे भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. Ayushman Bharat| आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार; आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे राज्यातील जनतेसाठी घेतला मोठा निर्णय ! अहमदनगर जिल्ह्यातील भन्ते सुमेध बोधी यांची या अखिल भारतीय भिक्खू संघाच्या महासचिव पदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल आज दिनांक 29 जून 2023 रोजी सकाळी १०:३० वाजता नालंदा बुद्ध विहार बाजारतळ जामखेड या ठिकाणी जामखेड शहर व तालुक्यातील सर्व उपासक व उपासिका व भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने पुज्य भन्ते सुमेध बोधी यांचा सन्मान करण्यात…
धनराज पवार: गुरुवार दि.२९/६/२०२३ रोजी आषाढी एकादशी निमित्त जामखेड शहरातील तपनेश्वर येथील हनुमान मंदिरात विठ्ठल – रुक्मीणी मातेचा अभिषेक व महापुजा संपन्न झाली. यावेळी महापुजेसाठी जामखेडचे कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार मा.श्री.मनोजजी भोसेकर व त्यांची पत्नी सौ.प्रियाताई भोसेकर तसेच जामखेडचे मंडलअधिकारी (सर्कल) मा.श्री.नंदकुमार गव्हाणे व त्यांच्या पत्नी सौ.हर्षदाताई गव्हाणे यांचे हस्ते संप्पन्न झाली. ही दोन्हीही दांम्पत्य पुजेसाठी उपस्थीत राहील्याबद्दल हनुमान मंदीर ट्रस्ट चे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.भोसेकर दांम्पत्याचा सत्कार मंदीर ट्रस्टचे विश्वस्त माऊली अंदुरे व त्यांच्या पत्नी सौ.मंजुषा अंदुरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गव्हाणे दांम्पत्याचा सत्कार मंदीर ट्रस्टचे विश्वस्त गणेश मासाळ व त्यांच्या पत्नी सौ.कल्याणी मासाळ यांचे हस्ते करण्यात…
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार जामखेड शहरात आज रोजी मक्का मस्जिद येथे शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. तसेच बकरी ईद निमित्त एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या.मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्जतचे डी.वाय.एस.पी. वाखारे ,जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील तसेच सर्व पाहुणे मंडळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्जतचे डी.वाय.एस.पी. वाखारे ,जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी ,उपाध्यक्ष सय्यद मंजूर भाई,शेरखान भाई,आबिद खान ,सय्यद इस्माईल,सय्यद मुख्तार,…
Ayushman Bharat आयुष्यमान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना एकिकृत पद्धतीने राबवून महाराष्ट्रातील संपूर्ण 12 कोटी नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात येणार आहे. या योजनेतून 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियेसह उपचार मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली होती. आता याच पार्श्वभूमीवर जळगावमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा या योजनेवर शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करण्याच्या सूचना करीत आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले, केंद्राची व राज्याची योजना समन्वयाने राबवल्यास केंद्र शासनाचा 60 टक्के निधी मिळतो. राज्याची बचत होते. त्यासाठी भारत सरकार आयुष्यमान Ayushman Bharat केंद्र योजनेला व्यापक स्वरूप देत…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार जामखेड येथे डॉ. चौरे बालरुग्णालय व मुळव्याध Piles – भगंदर हाॅस्पिटल, हे गेल्या अकरा वर्षांपासून तालुक्यातील सर्व परिसरातील रुग्णांसाठी अविरतपणे सेवा देत आहे. या रुग्णालयांमध्ये लहान मुलांचे सर्व प्रकारच्या आजारांवरील तसेच क्रिटिकल आजारांवरील निदान व उपचार हे अतिशय योग्य पध्दतीने व अत्यंत कमी खर्चात केले जाते.जामखेड व तालुक्यातील इतर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या खर्चापेक्षा डॉ.चौरे बालरुग्णालयात मुळव्याध – भगंदर हॉस्पिटलमध्ये खूप कमी किंमतीमध्ये उपचार आणि शास्र्रक्रिया केल्या जातात . आत्तापर्यंत अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. तसेच लहान बाळांच्या सर्व आजांरावरील उपचार हे अनुभवी बालरोग तज्ज्ञांकडून कमी खर्चात केले जातात. आता जामखेड मध्ये मुळव्याधीच्या Piles सर्व…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार आषाढी एकादशी निमित्त खर्डा ते धनेगाव (धाकटी पंढरी) महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बससेवा उपलब्ध.. दिनांक 29 जून रोजी गुरुवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आषाढी एकादशी निमित्त धनेगाव (धाकटी पंढरी) महिला व जेष्ठ नागरिकांसाठी मोफत दोन लक्झरी बसची सेवा प्रा. सचिन सर गायवळ त्यांच्या वतीने ठेवण्यात आली आहे याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा. याबाबत माहिती अशी की,हिंदू समाजासाठी पवित्र असणाऱ्या आषाढी एकादशीला पांडुरंग विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे लाखो वारकरी व भाविक भक्त दर्शनासाठी गेले आहेत, परंतु प्रत्येकाला पंढरपूरला जाणे शक्य नसल्याने जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या धनेगाव येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवारआज बुधवार दि 28 जून रोजी खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा येथील मुलांनी, मुलींनी व शुक्रवार पेठ शाळेने विद्यार्थ्यांची शाळेतून सिताराम गडावर दिंडी काढली या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या वेषातील मुले तसेच विणाकरी, मृदुंग वादक व टाळकरी ध्वजधारी विद्यार्थी आणि सर्व वारकरी विद्यार्थी सजून आले होते . गावातून पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढून सिताराम गड या ठिकाणी दिंडी नेण्यात आली. दिंडीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून गावचे सरपंच सौ संजीवनी ताई वैजनाथ पाटील यांनी पालखीचे पूजन करून दिंडीचे प्रस्थान केले .त्यांचे तर्फे सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप करण्यात आली. शाळेमध्ये व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत गुरसाळी व महेश गोलेकर…