Author: mahalokwani

धनराज पवार: गुरुवार दि.२९/६/२०२३ रोजी आषाढी एकादशी निमित्त जामखेड शहरातील तपनेश्वर येथील हनुमान मंदिरात विठ्ठल – रुक्मीणी मातेचा अभिषेक व महापुजा संपन्न झाली. यावेळी महापुजेसाठी जामखेडचे कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार मा.श्री.मनोजजी भोसेकर व त्यांची पत्नी सौ.प्रियाताई भोसेकर तसेच जामखेडचे मंडलअधिकारी (सर्कल) मा.श्री.नंदकुमार गव्हाणे व त्यांच्या पत्नी सौ.हर्षदाताई गव्हाणे यांचे हस्ते संप्पन्न झाली. ही दोन्हीही दांम्पत्य पुजेसाठी उपस्थीत राहील्याबद्दल हनुमान मंदीर ट्रस्ट चे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.भोसेकर दांम्पत्याचा सत्कार मंदीर ट्रस्टचे विश्वस्त माऊली अंदुरे व त्यांच्या पत्नी सौ.मंजुषा अंदुरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गव्हाणे दांम्पत्याचा सत्कार मंदीर ट्रस्टचे विश्वस्त गणेश मासाळ व त्यांच्या पत्नी सौ.कल्याणी मासाळ यांचे हस्ते करण्यात…

Read More

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार जामखेड शहरात आज रोजी मक्का मस्जिद येथे शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. तसेच बकरी ईद निमित्त एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या.मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्जतचे डी.वाय.एस.पी. वाखारे ,जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील तसेच सर्व पाहुणे मंडळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्जतचे डी.वाय.एस.पी. वाखारे ,जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी ,उपाध्यक्ष सय्यद मंजूर भाई,शेरखान भाई,आबिद खान ,सय्यद इस्माईल,सय्यद मुख्तार,…

Read More

Ayushman Bharat आयुष्यमान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना एकिकृत पद्धतीने राबवून महाराष्ट्रातील संपूर्ण 12 कोटी नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात येणार आहे. या योजनेतून 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियेसह उपचार मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली होती. आता याच पार्श्वभूमीवर जळगावमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा या योजनेवर शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करण्याच्या सूचना करीत आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले, केंद्राची व राज्याची योजना समन्वयाने राबवल्यास केंद्र शासनाचा 60 टक्के निधी मिळतो. राज्याची बचत होते. त्यासाठी भारत सरकार आयुष्यमान Ayushman Bharat केंद्र योजनेला व्यापक स्वरूप देत…

Read More

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार जामखेड येथे डॉ. चौरे बालरुग्णालय व मुळव्याध Piles – भगंदर हाॅस्पिटल, हे गेल्या अकरा वर्षांपासून तालुक्यातील सर्व परिसरातील रुग्णांसाठी अविरतपणे सेवा देत आहे. या रुग्णालयांमध्ये लहान मुलांचे सर्व प्रकारच्या आजारांवरील तसेच क्रिटिकल आजारांवरील निदान व उपचार हे अतिशय योग्य पध्दतीने व अत्यंत कमी खर्चात केले जाते.जामखेड व तालुक्यातील इतर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या खर्चापेक्षा डॉ.चौरे बालरुग्णालयात मुळव्याध – भगंदर हॉस्पिटलमध्ये खूप कमी किंमतीमध्ये उपचार आणि शास्र्रक्रिया केल्या जातात . आत्तापर्यंत अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. तसेच लहान बाळांच्या सर्व आजांरावरील उपचार हे अनुभवी बालरोग तज्ज्ञांकडून कमी खर्चात केले जातात. आता जामखेड मध्ये मुळव्याधीच्या Piles सर्व…

Read More

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार आषाढी एकादशी निमित्त खर्डा ते धनेगाव (धाकटी पंढरी) महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बससेवा उपलब्ध.. दिनांक 29 जून रोजी गुरुवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आषाढी एकादशी निमित्त धनेगाव (धाकटी पंढरी) महिला व जेष्ठ नागरिकांसाठी मोफत दोन लक्झरी बसची सेवा प्रा. सचिन सर गायवळ त्यांच्या वतीने ठेवण्यात आली आहे याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा. याबाबत माहिती अशी की,हिंदू समाजासाठी पवित्र असणाऱ्या आषाढी एकादशीला पांडुरंग विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे लाखो वारकरी व भाविक भक्त दर्शनासाठी गेले आहेत, परंतु प्रत्येकाला पंढरपूरला जाणे शक्य नसल्याने जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या धनेगाव येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी…

Read More

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवारआज बुधवार दि 28 जून रोजी खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा येथील मुलांनी, मुलींनी व शुक्रवार पेठ शाळेने विद्यार्थ्यांची शाळेतून सिताराम गडावर दिंडी काढली या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या वेषातील मुले तसेच विणाकरी, मृदुंग वादक व टाळकरी ध्वजधारी विद्यार्थी आणि सर्व वारकरी विद्यार्थी सजून आले होते . गावातून पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढून सिताराम गड या ठिकाणी दिंडी नेण्यात आली. दिंडीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून गावचे सरपंच सौ संजीवनी ताई वैजनाथ पाटील यांनी पालखीचे पूजन करून दिंडीचे प्रस्थान केले .त्यांचे तर्फे सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप करण्यात आली. शाळेमध्ये व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत गुरसाळी व महेश गोलेकर…

Read More

तारण कर्ज देणारी मूळ कंपनी HDFC लिमिटेड आणि देशातील सर्वात मोठी खाजगी बँक ‘HDFC बँक’ 1 जुलैपासून एक होणार आहे. एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी मंगळवारी दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण 1 जुलैपासून लागू होणार असल्याची घोषणा केली. यासह, 13 जुलैपासून एचडीएफसी लिमिटेडच्या स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध केलेल्या शेअर्सचे ट्रेडिंग एचडीएफसी बँकेच्या नावाने केले जाईल. 30 जून रोजी दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळांची विशेष बैठक होणार असून, त्यात विलीनीकरणासंबंधी आवश्यक मंजुरी देण्यात येणार आहेत. या विलीनीकरणाचा परिणाम एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक या दोन्ही कर्जदारांच्या करोडो ग्राहकांवर होणार आहे. दीपक पारेख म्हणतात की 30 जून रोजी एचडीएफसीच्या बोर्डाची शेवटची बैठक होणार आहे. एप्रिलमध्ये, भारतीय…

Read More

सोमराज बडे,पाथर्डी वृत्तसेवा: बुधवार दिनांक २७ जून 2023 रोजी चिंचपूर पांगुळ येथील श्री. वामनभाऊ विद्यालयात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा “गुणगौरव सोहळा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत वामभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच श्रीफळ वाढवून करण्यात आली. हे नक्की वाचा: Panjanrao Dakh |पंजाबराव डख एक शेतकरी ते हवामान तज्ञ; जाणून घ्या मेघराजाचा अचूक अंदाज दर्शविणाऱ्या पंजाबराव डख यांची कहाणी.. इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संघर्षयोद्दा बबनराव ढाकणे केदारेस्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरोडे सर व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,रोख बक्षिसे,प्रशिस्तीपत्रे व गुलाब-पुष्प देवून स्वागत केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ऋषिकेश ढाकणे हे होते…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार आज दिनांक 27/6/2023 रोजी सायंकाळी जामखेड शहरात जामखेड पोलीसांच्या वतीने आषाढी एकादशी व बकरी ईद अनुषंगाने शहरात रूट मार्च काढण्यात आला मार्च घेण्यात आला. हा रूट मार्च जामखेड पोलीस स्टेशन येथून सुरुवात होऊन बीड कॉर्नर-जयहिंद चौक-काझी गल्ली-सय्यदनगर-खर्डा रोड- तपनेश्वर रोड-नुराणी कॉलनी-खाडे नगर-बस स्थानक-मेन रोड-खर्डा चौक असा संपला. हे पण वाचा Panjanrao Dakh |पंजाबराव डख एक शेतकरी ते हवामान तज्ञ; जाणून घ्या मेघराजाचा अचूक अंदाज दर्शविणाऱ्या पंजाबराव डख यांची कहाणी.. आषाढी एकादशी व बकरी ईद हि एकाच दिवशी आल्याने त्या अनुषंगाने शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी रूट मार्च काढण्यात आला, जामखेड मधील मुस्लिम धर्मियांनी आषाढी एकादशी दिवशी बकरी…

Read More

समस्त फुले, शाहू, आंबेडकरी,साठे चळवळीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन. . अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरांमध्ये मनपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा देखील पूर्ण कृती पुतळा नगर शहरात सिद्धार्थ नगर येथील साठे चौकात आहे त्या ठिकाणी बसवण्याच्या मागणीसाठी समस्त फुले.शाहू. आंबेडकरी.साठे.चळवळीच्या वतीने मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड समवेत सोमा शिंदे, संपर्कप्रमुख नितीन कसबेकर, महिला जिल्हा अध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे, शोभा गाडे, महेमूदा पठाण, किरण जाधव, एकनाथराव गायकवाड, रेखा डोळस,…

Read More